Shirur Crime : राज्य उत्पादन शुल्क विभागाने घरावर छापा टाकून देशी-विदेशी दारूचा लाखो रुपयाचा साठा केला जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या शिरूर येथील पथकाने पोंदेवाडी येथील एका वस्तीवरील घरावर छापा टाकून देशी - विदेशी दारूचा सुमारे साडेतीन लाख रूपये किंमतीचा साठा केला जप्त.
liquor seized

liquor seized

sakal

Updated on: 

शिरूर - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या शिरूर येथील पथकाने काल रात्री उशिरा पोंदेवाडी (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथील एका वस्तीवरील घरावर छापा टाकून देशी - विदेशी दारूचा सुमारे साडेतीन लाख रूपये किंमतीचा साठा जप्त केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसशी संबंधित बड्या पदाधिकाऱ्याच्या घराजवळ ही कारवाई झाल्याने व याच घरात काही पदाधिकारीही राहात असल्याची माहिती पुढे आल्याने खळबळ उडाली आहे. या दारूसाठा प्रकरणावरून परीसरात उलट - सुलट चर्चा आहे.

Loading content, please wait...