esakal | राज्य सरकारकडून पोलिस पदकं जाहीर; प्रशंसनीय कामगिरीमध्ये पुणे पोलिसांचाही सन्मान

बोलून बातमी शोधा

राज्य सरकारकडून पोलिस पदकं जाहीर; प्रशंसनीय कामगिरीमध्ये पुणे पोलिसांचाही सन्मान
राज्य सरकारकडून पोलिस पदकं जाहीर; प्रशंसनीय कामगिरीमध्ये पुणे पोलिसांचाही सन्मान
sakal_logo
By
पांडुरंग सरोदे : सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्य सरकारच्या गृह विभागामार्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र दिनाच्या पुर्वसंध्येला महाराष्ट्र पोलिस दलात कर्तव्य बजावताना उल्लेखनिय व प्रशंसनिय सेवा बजाविणाऱ्या राज्यातील 779 पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलिस पदक, पोलिस पदक व पोलिस शौर्य पदक जाहिर झाले आहे. पुण्याचे सहपोलिस आयुक्त डॉ.रवींद्र शिसवे, पोलिस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, सहाय्यक पोलिस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्यासह शहर पोलिस दलातील 30 पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलिस पदक जाहीर झाले आहे.

सहपोलिस आयुक्त डॉ.शिसवे यांना गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पोलिस पदक जाहिर झाले आहे. डॉ.शिसवे यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा अबाधित ठेवणे, सराईत विविध कायद्यांचा वापर करुन गुन्हेगारांवर वचक बसविणे त्याचबरोबर मागील वर्षीपासून निर्माण झालेल्या कोरोना साथरोग कालावधीमध्येही उल्लेखनीय कार्य बजावले आहे. परिमंडळ तीनच्या पोलिस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनाही गुणवत्तापुर्ण सेवेसाठी, तर गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलिस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांना सेवेत सतत 15 वर्ष उत्तम सेवाभिलेख यासाठी पोलिस पदक जाहिर झाले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रतिभा जोशी यांना गुणवत्तापुर्ण सेवेसाठी, तर उत्तमनगरच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांना विशेष शाखेत उत्तम कामगिरी केल्याबद्दल, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रल्हाद भोसले यांनाही पदक जाहिर करण्यात आले आहे.

हेही वाचा: उद्यापासून 18 ते 45 वयोगटालीत लसीकरण नावालाच!

पोलिस उपनिरीक्षक अक्षयकुमार गोरड यांना दरोडा व गुन्हेगारांच्या टोळ्यांविरुद्ध कारवाई केल्याबद्दल पदक प्राप्त झाले आहे. पोलिस उपनिरीक्षक अरविंद चव्हाण, शिवदास गायकवाड, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रल्हाद भोसले, शिवाजी शेळके, राजेंद्र जगताप, दिलीप काची, दत्तात्रय शेळके, पोलिस हवालदार विजय भोंग, प्रदीप शितोळे, सुनील शिंदे, राजकुमार बारबोले, किरण देशमुख, कृष्णा बढे, विजय कदम, यशवंत खंदारे, पोलिस नाईक मनोज जाधव, मंगेश बोऱ्हाडे, दिपक दिवेकर यांना सेवेत सतत 15 वर्ष उत्तम सेवाभिलेख, महिला पोलिस शिपाई हेमलता घोडके यांना राष्ट्रीय स्तरावर खेळात प्राविण्य मिळाल्याबद्दल पदक जाहीर झाले आहे.

ग्रामीण पोलिस दलामधील अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही सन्मान

पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, विलास देशपांडे, प्रताप मानकर, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शब्बीर पठाण, पोलिस हवालदार उमाकांत कुंजीर यांना 15 वर्ष उत्तम सेवाभिलेख, तर पोलिस शिपाई सुलतान डांगे यांना राष्ट्रीय स्तरावरील खेळात प्राविण्य मिळविल्याने पोलिस पदक जाहीर झाले आहे.

अन्य विभागाचेही गृहविभागाकडून कौतुक

पुणे महानगर विकास प्राधिकरणाचे पोलिस उपायुक्त निलेश अष्टेकर, बिनतारी संदेश विभागाच्या पोलिस अधिक्षक स्मार्तना पाटील, गुन्हे अन्वेषण विभागातील पोलिस निरीक्षक अनिल मयेकर, लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील पोलिस निरीक्षक गिरीश सोनवणे, यतीन संकपाळ यांनाही पदक जाहीर केले आहे.