पुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारीपदी विजय देशमुख यांची नियुक्ती

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 September 2020

अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांचे 7 मे 2020 ला निधन झाले होते. तेव्हापासून या पदावर प्रभारी अधिकारी काम करत होते.

पुणे : राज्य सरकारने पुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारीपदी विजय देशमुख यांची नियुक्ती केली आहे. देशमुख यांनी बुधवारी (ता.23) रात्री उशिरा पदभार स्वीकारला. यामुळे चार महिन्यांच्या खंडानंतर पुण्याला पूर्णवेळ अतिरिक्त जिल्हाधिकारी मिळाले आहेत.

तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांचे 7 मे 2020 ला निधन झाले होते. तेव्हापासून या पदावर प्रभारी अधिकारी काम करत होते. देशमुख हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मर्जीतील अधिकारी म्हणून ओळखले जातात.

IPL 2020 : शतकवीर राहुलचे बल्ले बल्ले! पंजाबने उडवला बेंगलोरचा धुव्वा​ 

देशमुख यांना पुणे जिल्ह्यात काम करण्याचा अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी
पुणे आणि सोलापूर येथे निवासी उपजिल्हाधिकारी, बारामती आणि इचलकरंजी येथे प्रांताधिकारी आणि पुण्यात कुळकायदा शाखेचे उपजिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेतही कार्यरत होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उत्पन्नाचा स्रोत वाढविण्यात त्यांनी मोलाची भूमिका निभावली होती. त्यांना तार महिन्यांपूर्वीच अतिरिक्त जिल्हाधिकारी संवर्गात पदोन्नती मिळाली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: state government appointed Vijay Deshmukh as Additional District Collector of Pune