
पुणे/घोरपडी : राज्यातील पुणे, खडकी, देवळाली, छत्रपती संभाजीनगर, कामठी, अहिल्यानगर हे सहा कँटोन्मेंट बोर्ड लगतच्या स्थानिक स्वराज्य संस्थांत विलीन करण्याबाबत राज्य सरकारने अनुकूलता दर्शविली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गुरुवारी मुंबईत याबाबत बैठक झाली. आणखी एक बैठक झाल्यानंतर विलीनीकरणाबाबतचा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाकडे पाठविला जाणार आहे.