शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी राज्य सरकार बांधील - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 28 January 2020

पुणे - ""राज्यातील शेतकरी, कष्टकरी, गरीब, वंचित, उपेक्षितांच्या उन्नतीसाठी राज्य शासन बांधील आहे,'' असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी केले. 

पुणे - ""राज्यातील शेतकरी, कष्टकरी, गरीब, वंचित, उपेक्षितांच्या उन्नतीसाठी राज्य शासन बांधील आहे,'' असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी केले. 

प्रजासत्ताक दिनाच्या 70व्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी (ता. 26) शिवाजीनगर पोलिस परेड मैदानावर उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते मुख्य सरकारी ध्वजवंदन झाले. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई, जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, नागरिक या वेळी उपस्थित होते. पवार यांनी विविध पथकांची पाहणी करून मानवंदना स्वीकारली. राष्ट्रपती पोलिस पदकप्राप्त आणि विशेष सुरक्षा पदकप्राप्त; तसेच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले. 

राज्य राखीव पोलिस बल, जलद प्रतिसाद पथक, पुणे पोलिस आयुक्तालय पथक, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय, पोलिस अधीक्षक कार्यालय, महिला पोलिस दल, रेल्वे पोलिस दल, गृहरक्षक दल, एनसीसी आणि शालेय विद्यार्थ्यांच्या पथकांनी या वेळी संचलन केले; तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, वनविभाग, सामाजिक वनीकरण आणि आरोग्य विभाग यांनी माहितीपर चित्ररथ सादर केले. पोलिस वाद्यवृंद, वाहतूक पोलिस, श्वान जॅक गुन्हे शोधक यांनी सलामी दिली. प्रारंभी पवार यांनी पद्म पुरस्कार, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित; तसेच पोलिस आणि अग्निशमन सेवा पदकप्राप्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. 

अजित पवार म्हणाले... 
स्वातंत्र्य सैनिकांचा त्याग आपण सदैव स्मरणात ठेवायला हवा 
पर्यावरण रक्षणासाठी नागरिकांनी प्लॅस्टिकच्या वस्तूंचा वापर टाळावा 
"प्लॅस्टिकमुक्त महाराष्ट्र' संकल्प अभियानास प्रारंभ 
कौशल्य विकासासाठी कृषी आयटीआयची संकल्पना राबविणार 
राज्यातील हेरिटेज वास्तू, पर्यटन स्थळांचे सौंदर्य वाढविणार 
पुणे पोलिस दलाच्या प्रयत्नांमुळे गुन्ह्यांच्या संख्येत घट 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: state government is committed to the farmers and the workers says ajit pawar