esakal | आता आम्ही घरी जायचे कसे? राज्य सरकारने केली विद्यार्थ्यांची फसवणूक
sakal

बोलून बातमी शोधा

The state government has fooled the students for free travel to return home

पुण्यात स्पर्धा परीक्षा व इतर शिक्षण घेणारे ३ हजार पेक्षा जास्त विद्यार्थी अडकून पडले आहेत. या सर्वांना घरी जायची आस लागलेली आहे. पुण्यात एकट्याने रहावे लागत असल्याने विद्यार्थी मानसिक तणावात आहेत. सरकारने 'कोटा'तील विद्यार्थ्यांप्रमाणे आम्हाला ही घरी सोडावे अशी मागणी गेल्या एका आठवड्यापासून करत आहेत.

आता आम्ही घरी जायचे कसे? राज्य सरकारने केली विद्यार्थ्यांची फसवणूक

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : "राज्यातील मजूर, विद्यार्थी यांच्यासाठी मोफत एसटी बससेवा सुरू करण्याची घोषणा सरकारने केली होती. मात्र सरकारने यात विद्यार्थ्यांना दिलासा न देता उलट एका सिटसाठी दुप्पट तिकीट मोजावे लागत असल्याने विद्यार्थी संतप्त झाले आहेत. सरकारने आम्हाला गंडविले आहे,आम्ही  घरी जायचे कसे सवाल पुण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांनी केला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्यात स्पर्धा परीक्षा व इतर शिक्षण घेणारे ३ हजार पेक्षा जास्त विद्यार्थी अडकून पडले आहेत. या सर्वांना घरी जायची आस लागलेली आहे. पुण्यात एकट्याने रहावे लागत असल्याने विद्यार्थी मानसिक तणावात आहेत. सरकारने 'कोटा'तील विद्यार्थ्यांप्रमाणे आम्हाला ही घरी सोडावे अशी मागणी गेल्या एका आठवड्यापासून करत आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

११ मे पासून मोफत एसटी बससेवा सुरू केली जाईल अशी घोषणा केली होती. मात्र सरकारने काढलेल्या आदेशात जे मजूर व इतर व्यक्ती परप्रांतात जाणार आहेत त्यांना राज्याच्या सीमेवर सोडणे व परप्रांतातून महाराष्ट्रात येणार आहेत त्यांना सीमेवरून घेऊन येणे यासाठी मोफत बससेवा आहे. याचा लाभ विद्यार्थ्यांना मिळणार नसल्याने पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थी संतप्त झाले आहेत.

कोरोनाग्रस्तांवर उपचार करून घरी परतली नर्स; पतीने केले अशाप्रकारे स्वागत...
 
बुलढाणा येथील अमोल खर्चे म्हणाला, "कोटा'चे विद्यार्थी मोफत प्रवासाने महाराष्ट्रात आणले तसे, आम्हाला गावाकडे जाण्यासाठी व्यवस्था होईल असे वाटले होते.  मात्र, जो आदेश निघाला आहे यात सरकारने आमची फसवणूक केली आहे. आता गावाकडे जायचे कसे, असाच प्रश्न पडला आहे."

घराच्या ओढीने काळीज तुटत होतं, पण असा झाला घोळ... 

"सरकारला जर विद्यार्थ्यांची व्यवस्था करता येत नसेल तर त्यांनी आता विद्यार्थ्यांना गावाकडे पायी चालत जाण्याची परवानगी द्यावी. विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा सरकार संवेदनशीलपणे विचार करत नाही. मध्यरात्रीतून आदेश बदलून फसवणूक केली आहे. सरकारने हा निर्णय रद्द करून, विद्यार्थ्यांच्या मोफत प्रवासाची सोय करावी"
- महेश बडे, अध्यक्ष, एमपीएससी स्टुडंट्स राईट्स