घरेलू कामगारांनो, अफवांवर विश्वास ठेऊ नका! 'अशी' होतेय आर्थिक फसवणूक

Fraud with domestic workers The state government has not decided to help domestic workers in cash
Fraud with domestic workers The state government has not decided to help domestic workers in cash

पुणे : कोरोनाच्या आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या घरेलू कामगारांना राज्य सरकार रोख स्वरूपात मदत देणार आहे, असे सांगून त्यांच्याकडून पैसे घेऊन लुटण्याचा प्रकार शहरात सुरू झाला आहे. दरम्यान, राज्य सरकारने घरेलू कामगारांना रोख स्वरूपात मदत करण्याचा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे कोणालाही पैसे देऊ नका, असे कामगार आयुक्त कार्यालयाने मंगळवारी स्पष्ट केले. 

शहरातील येरवडा, पर्वती दर्शन, मंगळवार पेठ भागात हा प्रकार सुरू आहे. काही युवक स्वयंसेवी संस्थेचे नाव सांगून घरेलू कामगारांकडून फॉर्म भरून घेत आहेत. त्यात राज्य सरकारकडून रोख स्वरूपात मदत मिळावी म्हणून मागणी करण्यात येत आहे. त्यासाठी तुमची संपूर्ण माहिती नोंदवावी लागेल, असे सांगून या कामगारांकडून प्रत्येकी वीस रुपये घेत आहेत. या पद्धतीने हजारो फॉर्म भरले गेले आहेत. राष्ट्रीय मजदूर संघाचे सुनील शिंदे या पूर्वी घरेलू कामगार मंडळाचे सदस्य होते. त्यामुळे वस्ती भागातील काही कार्यकर्ते आणि महिलांनी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांना भरून घेतल्या जात असलेल्या फॉर्मबद्दलची माहिती दिली. शिंदे यांनी कामगार आयुक्त, समाज कल्याण विभागात चौकशी केली. तेव्हा राज्य सरकारची या बाबत कोणतीही योजना नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे शिंदे यांनी सकाळशी संपर्क साधून या बाबतची माहिती दिली. 

पुण्यात नक्की चाललंय तरी काय; उपचाराअभावी तडफडताहेत कोरोना रुग्ण!​

'सकाळ'ने या बाबत अप्पर कामगार आयुक्त शैलेश पोळ यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा त्यांनी राज्य सरकारची काही योजना असेल तर वृत्तपत्रातून प्रकटन करण्यात येईल, असे सांगितले. तसेच मदतीच्या अपेक्षेखाली कोणीही फॉर्म भरून देऊ नका आणि त्यासाठी पैसे देऊ नका, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या बाबत ज्यांची फसवणूक झाली आहे, त्यांनी पोलिसांकडे तक्रार द्यावी. त्याचा गुन्हा दाखल व्हावा, म्हणून कामगार आयुक्त कार्यालय नक्कीच सहकार्य करेल, असेही पोळ यांनी सांगितले. 

शिंदे म्हणाले, एक तर घरेलू कामगारांना कामावर घेण्यासाठी अजूनही अनेक सोसायट्यांमध्ये आडकाठी केली जात आहे. त्यातच त्यांना मदतीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळणे हा वाईट प्रकार आहे. त्यामुळे घरेलू कामगारांनी कोणालाही पैसे देऊ नयेत तसेच मदतीसाठी कोणताही फॉर्म भरू नये, असे आवाहनही शिंदे यांनी केले. 

पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड परिसरात सुमारे अडीच लाख घरेलू कामगार आहेत. कोरोनामुळे 25 मार्चपासून लॉकडाउन सुरू झाल्यापासून त्यांच्या रोजगारावर गदा आली आहे. त्यामुळे हे कामगार सध्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. 
 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com