राज्य शासनाने रझा अॅकॅडमीवर बंदी घालावी - निवृत्त कर्नल सुरेश पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यसभा खासदार सहस्रबुद्धे यांना दिले निवेदन

राज्य शासनाने रझा अॅकॅडमीवर बंदी घालावी - निवृत्त कर्नल सुरेश पाटील

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उंड्री : देशाच्या सुरक्षेसाठी जवान रात्रंदिवस कार्यरत आहेत. त्यांच्याप्रती देशवासियांची आदराची भावना आहे. मात्र, सैनिक स्मारकाची तोडफोड करत राज्यामध्ये दंगल घडविणाऱ्या रझा अॅकॅडमीवर राज्य सरकारने तात्काळ बंदी घालावी, अशी मागणी राज्यसभा खासदार विनय सहस्त्रबुद्धे, माजी आमदार जगदीश मुळीक यांना ग्रीन थंम्बचे अध्यक्ष निवृत्त कर्नल सुरेश पाटील यांनी निवेदन देऊन केली.

याप्रसंगी शंभुसेना प्रमुख दिपकराजे शिर्के, राष्ट्रीय उपाध्यक्ष सैनिक फेडरेशन, सैनिक फेडरेशन कार्याध्यक्ष नारायण अंकुशे, शंभुसेना प्रदेश सरचिटणीस बाबासाहेब जाधव, कॅप्टन परशुराम शिंदे, कॅप्टन कटके, कॅप्टन बाबू जाधव, भामे, पडवळ, शिर्के, अंकुशे, महाजन, अंधारे, सुभेदार धुमाळ, माजी सैनिक आदी उपस्थित होते. रझा अॅकॅडमीने २०१२ साली राज्यासह मुंबईतील स्मारकाची तोडफोड केल्याचा निषेध नोंदविण्यात आला.

निवृत्त कर्नल सुरेश पाटील म्हणाले की, जस्टीस फॉर जवान संघटनेने महाराष्ट्र शासनातर्फे लोकार्पण केलेल्या स्मारकाची रझा अॅकॅडमीने तोडफोड केली. त्यावेळी महाराष्ट्र दंगे होऊ नयेत, म्हणून सैनिकांनी संयम बाळगला. त्यामुळे शासनाने रझा अॅकॅडमी संघटनेवर बंदी घालावी, अशी मागणी त्यांनी केली.

loading image
go to top