esakal | शिक्षकांनंतर आता सर्वांना ड्रेसकोड; वाचा यादीत कोणा-कोणाचा आहे समावेश?
sakal

बोलून बातमी शोधा

School_Teachers_Dresscode

सर्वसामान्याकडून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची प्रतिमा चांगली असावी,अशी अपेक्षा असते. त्यामुळे सर्वांनी शासकीय परिपत्रकानुसार नेमून दिलेले गणवेश परिधान करावेत.

शिक्षकांनंतर आता सर्वांना ड्रेसकोड; वाचा यादीत कोणा-कोणाचा आहे समावेश?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

देहू (पुणे) : राज्य शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या मंत्रालयातील सर्व विभाग तसेच सर्व शासकीय कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी, सल्लागार यांना आता ड्रेसकोडमध्ये कार्यालयात उपस्थित राहावे लागणार आहे. तसा आदेश असणारे परिपत्रक राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने मंगळवारी (ता.8) काढले आहे.

हे परिपत्रक सर्व शासनाच्या सर्व विभागांना पाठविण्यात आले आहे. तसेच राजकीय पक्षांनाही पाठविण्यात आले आहे. या ड्रेसकोडमध्ये कार्यालयात जीन्स पॅन्ट, टी शर्टचा वापर करू नये, असे सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कार्यालयात स्लिपरचाही वापरावर बंदी घालण्यात आली आहे. मंत्रालय आणि त्यातंर्गत येणाऱ्या सर्व कार्यालयातून शासनाचा कारभार चालतो. शासनाची ही सर्व कार्यालये ही जनमानसातील प्रतिनिधी म्हणून पाहण्यात येतात. या कार्यालयात खासदार, आमदार, नगरसेवक, लोकप्रतिनिधी, संस्था प्रतिनिधी इत्यादी त्यांच्या कामासाठी भेट देतात.

बारावीच्या विद्यार्थ्यांनो, 2021मध्ये होणाऱ्या बोर्ड परीक्षेचे भरा फॉर्म; वाचा सविस्तर बातमी​

या सर्वांशी शासनाचे अधिकारी संवाद साधतात. अशावेळी राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून अधिकारी, कर्मचारी यांची वेशभूषा हा व्यक्तिमहत्वाचा महत्वाचा भाग आहे. या वेशभूषेवरून संबंधित कार्यालयाची छाप भेट देणाऱ्या अभ्यागंतावर पडत असते. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांनी आपले व्यक्तिमहत्व आणि वेशभूषेबद्दल जागरूक राहणे आवश्यक असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे. मात्र, अनेक ठिकाणच्या कार्यालयात अधिकारी, कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी, सल्लागार हे कार्यालयीन कामकाजाच्यावेळेत शासकीय कर्मचाऱ्याला अनुरुप वेशभूषा वापरत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांची जनमाणसातील प्रतिमा मलिन होते.

आमदार माधुरी मिसाळ यांच्या बंगल्यात चोरी; 18 लाखांचे दागिने चोरट्यांनी केले लंपास​

सर्वसामान्याकडून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची प्रतिमा चांगली असावी,अशी अपेक्षा असते. त्यामुळे सर्वांनी शासकीय परिपत्रकानुसार नेमून दिलेले गणवेश परिधान करावेत. तसेच काही सूचनांचे पालन करावेत, असे आदेश दिलेले आहेत.

सूचना -
1) सर्व अधिकारी, कर्मचारी यांचा पेहराव व्यवस्थित असावा. महिलांनी साडी, सलवार, चुडीदार कृर्ता, ट्राऊढर पॅन्ट आणि त्यावर कुर्ता अथवा शर्ट, आवश्यक असल्यास दुपट्टा यासह पेहराव करावा. पुरुषांनी शर्ट, पॅन्ट, ट्राऊझर असा पेहराव करावा. तसेच जीन्स पॅन्ट, टीशर्ट वापरू नये.

2) दर शुक्रवारी खादी वापरावी. त्यामुळे खादीला प्रोत्साहन मिळेल.

3) गडद रंगाचे नक्षीकाम केले चित्रे असणारे कपडे वापरू नयेत.

4) कार्यालयीन वेळेत ओळखपत्र दर्शनी भागावर धारण करावे.

5) महिला कर्मचारी, अधिकारी यांनी कार्यालयात चपला, सॅन्डल, बूट यांचा वापर करावा. कार्यालयात स्लिपर्स वापरू नयेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी ► क्लिक करा 

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image
go to top