विद्यार्थ्यांच्या 'आधार'साठी शिक्षकांची धावाधाव; शाळा कधी सुरू होणार काय माहित?

Students_Aadhaar
Students_Aadhaar

पुणे : शाळा कधी सुरू होणार? याबाबत अनिश्चितता असताना तसेच अद्याप अनेक विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोचलेले नसताना राज्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची नोंद मार्चपर्यंत पूर्ण करण्याचा आदेश शिक्षण विभागाने दिला आहे. त्यामुळे एकीकडे ऑनलाइन पद्धतीने अभ्यासक्रम शिकवून पूर्ण करत असताना आता शिक्षकांना विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक नोंदविण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे.

सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना आधार कार्डशी जोडण्याचा निर्णय जून २०१३ मध्येच राज्य सरकारने घेतला. सरल प्रणालीद्वारे ही प्रक्रिया सुरू होती. शाळांनी टप्प्या-टप्प्याने आधार नोंदणी पूर्ण करावी आणि सरल प्रणालीत ३१ मार्चपर्यंत सगळ्या म्हणजे १०० टक्के विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण होईल, असे पहावे, अशा सूचना राज्य सरकारने सप्टेंबर २०२०मध्ये काढलेल्या आदेशात म्हटले आहे.  

शाळांमधील शिक्षकांची पदे निश्चित करताना आधार कार्ड नोंदणी झालेल्याच विद्यार्थ्यांची संख्या ग्राह्य धरण्यात येईल. त्यामुळे विशेष मोहिम राबवून ही नोंदणी पूर्ण करावी, असे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम शिकवत असतानाच शिक्षकांना आधार कार्ड नोंदणीसाठी विद्यार्थी आणि पालकांकडून पाठपुरावा करावा लागत असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.

"विद्यार्थ्यांची आधार नोंदणी पूर्ण करण्यासाठी शिक्षकांमार्फत सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. मात्र अद्यापही अनेक पालक बाहेरगावी असल्याने त्या विद्यार्थ्यांची आधार कार्ड नोंदणी करवून घेताना अडचणी येत आहे. परंतु सर्व शिक्षकांना वर्गातील ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप आधार कार्ड काढलेले नाही, त्यांच्या पालकांशी तातडीने संवाद साधून आधारकार्ड काढण्यास सांगतिले आहे."
- संजय सोमवंशी, मुख्याध्यापक, सुंदरबाई मराठे विद्यालय, खराडी

राज्यातील शाळांची संख्या : १,१०,३१५
विद्यार्थ्यांची संख्या : २,२५,६०,५७८
सरल प्रणालीत आधार क्रमांक नोंदविणे प्रलंबित असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या : ६४,५८, ३८८

विद्यार्थ्यांची आधार कार्ड नोंदविण्यात येणाऱ्या अडचणी :
- विद्यार्थ्यांची आधार नोंदणी करण्याबाबत पालक अनभिज्ञ
- आधार नोंदणीत पालकांकडून होणारी दिरंगाई
- विद्यार्थी आणि पालक अद्यापही बाहेरगावी

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited By: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com