‘लेक टुरिझम’ राज्यात नवा पर्याय

‘आतिथ्य - अ जर्नल ऑफ हॉस्पिटॅलिटी’ शोधपत्रिकेतील निष्कर्ष
 lake tourism
lake tourismsakal
Updated on

पुणे : जगप्रसिद्ध लोणार सरोवर असो की पुण्यातील पाषाण तलाव, कोरोनानंतर राज्यभरात तलाव पर्यटनात अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. पाण्यातील साहसी खेळ, बोटींग, स्नेहमिलने, करमणूक किंवा मनोरंजनासाठी तलाव पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रे ठरत आहेत. या ‘लेक पर्यटना’च्या वाढीसाठी पायाभूत सुविधांची आवश्‍यकता असल्याचे निरिक्षण ‘आतिथ्य - अ जर्नल ऑफ हॉस्पिटॅलिटी’ या शोधपत्रिकेत नोंदविण्यात आले आहेत.

ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीच्या (एआयएसएसएमएस) कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरींग टेक्नॉलॉजीच्या (एचएमसीटी) प्रा. डॉ. प्रेरणा भौतिक यांनी या संबंधीचा अभ्यास केला आहे. राज्यातील सर्वच भागात तलावांचे प्रमाण असून स्थानिक लोक शिबिरे, कार्यक्रम, परिसर भेट, शाळांच्या अभ्यास सहली आयोजित केल्या जातात. मात्र त्यांना पर्यटनाच्या दृष्टीने पाहिले जात नाही. ग्रामीण भागातील पर्यटन, लघू उद्योग, कृषी पर्यटन, वाहतूक आदी उद्योगांना यातून चालना मिळू शकते.

डॉ. भौतिक म्हणाल्या, ‘‘बदलत्या जीवनशैलीमुळे ताणतणावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी जवळच्या निसर्गरम्य ठिकाणाला भेट देण्याचा मार्ग निवडला जात आहे. त्यात सर्वाधिक जास्त प्राधान्य तलावांना दिले जात असल्यामुळे राज्यात ‘लेक टुरिझम’ हा पर्यटनाचा नवा पर्याय म्हणून ओळखला जात आहे. पर्यटनस्थळांमध्ये तलावांचा समावेश केल्यास संवर्धनाबरोबरच तलावांचे सौंदर्य ही वाढेल. तसेच स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होईल.’’

पायाभूत सुविधांवर भर

  • तलावांच्या पाण्याचे शुद्धीकरण आणि स्वच्छता

  • स्वच्छ सार्वजनिक शौचालय

  • कचरा व्यवस्थापनासाठी परिसरात कचऱ्याचे डब्यांची सुविधा

  • स्वच्छ आणि सुरक्षित चेंजिंग रूम

महत्त्वाच्या बाबी

  • ‘लेक टुरिझम’च्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या आर्थिक उत्पन्नाचा वापर परिसरातील सुविधांच्या देखभालीसाठी फूड पार्क, पाण्यातील साहसी खेळांमुळे स्थानिकांना रोजगार

  • पर्यटनाचा नवा पर्याय

  • स्थानिक खाद्य पदार्थांची ओळख

या दिवसांना असते प्राधान्य (टक्के)

  • सार्वजनिक सुट्टी ५९.५०

  • शनिवार-रविवार ३७.८०

  • सोमवार ते शुक्रवार २.७०

तलावाला भेट देण्याचे कारण (टक्के)

  • नैसर्गिक सौंदर्य ९१.९

  • नजीकचे ठिकाण ५.४

  • पायाभूत सुविधा २.७

पर्यटकांची आवड (टक्के)

  • बोटींग ४५.९

  • पाण्यातील साहसी खेळ ३५.१

  • स्नेहमिलने ३२.४

  • मनोरंजन १८.९

कोरोनानंतर पर्यटनात वाढ झाली असून पारंपारिक पर्यटनाऐवजी ‘ॲडव्हेंचर’ला प्राधान्य देत आहेत. त्यात बोटींग, पाण्यातील साहसी खेळ आदींचा समावेश आहे. तसेच या गोष्टींसाठी दुसऱ्या राज्यात किंवा शहराबाहेर न जाता या सुविधा त्यांना नजीकच्याच परिसरात उपलब्ध होतील असे पर्याय जस्त निवडले जातात. त्या अनुषंगाने पर्यटनाला चालना मिळावी म्हणून महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाद्वारे (एमटीडीसी) राज्यातील विविध तलावांमध्ये या सुविधा तयार करण्यात येत आहेत. काही ठिकाणी पाण्यातील साहसी खेळांची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून लवकरच लोणार येथे ही यावर काम करण्याचे नियोजन आहे.

- दीपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक, एमटीडीसी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com