राज्यात आता कोरोनाबरोबरच क्षयरोगाचेही आव्हान

कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणेसमोर अभूतपूर्व आव्हान उभे ठाकले आहे. विशेषतः क्षयरोग कार्यक्रमावर याचा परिणाम झाला आहे.
Tuberculosis
TuberculosisSakal

पुणे - कोरोनाबाधितांच्या (Corona) वाढत्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणेसमोर अभूतपूर्व आव्हान उभे ठाकले आहे. विशेषतः क्षयरोग (Tuberculosis) कार्यक्रमावर याचा परिणाम झाला आहे. इतके मोठे आव्हान असूनही, गरजूंना क्षयरोगासाठी आरोग्यसुविधा उपलब्ध व्हाव्यात याची खात्री करण्यासाठी महाराष्ट्र क्षयरोग कार्यक्रमाने अनेक महत्त्वाच्या उपाययोजना केल्या आहेत. राज्य एकाचवेळी कोरोना आणि क्षयरोगाशी लढा देत आहे, असे मत कुटुंब कल्याण विभागातील आरोग्य सेवा संचालनालयाच्या संचालिक डॉ. अर्चना पाटील यांनी व्यक्त केले. (State Now Faces Challenge of Tuberculosis along with Corona)

राज्य क्षयरोग कार्यालयाने आयोजित केलेल्या आभासी पत्रकार परिषदेत त्यांनी डॉ. पाटील यांनी ही माहिती दिली. यावेळी जागतिक आरोग्य संघटनेचे राज्य सल्लागार डॉ. अनिरुद्ध कडू, राज्य क्षयरोग अधिकारी डॉ. रामजी अडकेकर उपस्थित होते.

जनसामान्यांमध्ये खोकला या सर्वसाधारणपणे आढळणाऱ्या लक्षणाबद्दल असलेली भीती आणि कलंकाची भावना यामुळे सरकारदफ्तरी नोंदणी झालेल्या क्षयरुग्णांच्या संख्येत बऱ्यापैकी घट झाल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. कोरोनाकाळात क्षयरोग रुग्णांना घरपोच औषधे पोचविणे, क्षयरोगाच्या निदानासाठी मदत मिळावी यासाठी खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांशी भागीदारी, सामाजिक स्तरावर सहभाग या उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत.

Tuberculosis
12th Exam Cancelled : "बरं झालं, पण पुढच्या परिणामांचं काय?"

अशी आहे स्थिती..

  • १९,००० - कोरानापूर्वी दर महिन्याला क्षयरुग्णांची सरासरी नोंद

  • १०,०३६ - एप्रिल २०२१ मधील नोंद

  • ५,२६४ - ऑक्टोबर २०२० आणि एप्रिल २०२१ या कालावधीतील नोंद

  • १२,८२३ - जानेवारी २०२१ पर्यंत क्षयरोगाचे निदान झालेली संख्या

  • ८ कोटी - डिसेंबर २०२०मध्ये एसीएफ अभियानांतर्गत तपासणी करण्यात आलेले नागरिक

क्षयरोगाचे नियंत्रण आणि निर्मूलनासाठी नावीन्यपूर्ण धोरणांची अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. खासगी वैद्यकीय क्षेत्राचा सहभाग, समुदायाचा सहभाग आणि जाणीवजागृती याबाबत आमचा अनुभव क्षयरोग व कोरोनाशी संयुक्तपणे लढा देताना आम्हाला कामी येत आहे. २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त महाराष्ट्राचे ध्येय गाठू शकू, असा आम्हाला विश्वास आहे.

- डॉ. रामजी अडकेकर, राज्य क्षयरोग अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com