
पुणे : ‘‘वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूनंतर राज्य महिला आयोगाने स्वत:हून तक्रार दाखल केली. त्यावर बावधन पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. वैष्णवी यांच्यावरील अन्यायाबाबत यापूर्वी महिला आयोगाकडे तक्रार प्राप्त झालेली नव्हती. परंतु या संवेदनशील प्रकरणात राजकीय विरोधकांकडून नैराश्येपोटी टीका करण्यात येत आहे,’’ असे मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केले.