Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

कृषी विभागाच्या आकृतिबंधाबाबत ठोस निर्णय होत नसल्याच्या निषेधार्थ राज्यातील कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आंदोलन तीव्र केले आहे.
Agriculture Employee Strike

Agriculture Employee Strike

sakal

Updated on

पुणे - कृषी विभागाच्या आकृतिबंधाबाबत ठोस निर्णय होत नसल्याच्या निषेधार्थ राज्यातील कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आंदोलन तीव्र केले आहे. आंदोलनाच्या पुढील टप्प्यात शुक्रवारी (ता. ११) सहाय्यक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी आणि मंडळ कृषी अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडील लॅपटॉप कार्यालयात जमा केले. त्यामुळे कृषी विभागाचे ऑनलाइन कामकाज ठप्प झाल्याचा दावा महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघाने केला असून, राज्यभरात दहा हजारांहून अधिक लॅपटॉप जमा झाल्याचे महासंघाने म्हटले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com