
पुणे : राज्यातील शिंदे सरकारनं गरीबांसाठी दिवाळी सणानिमित्त १०० रुपयांत शिधा कीटचं वाटप करणार असल्यांची घोषणा केली होती. पण अद्याप दिवाळी तोंडावर असतानाही गरीबांना याचं वाटप झालेलं नाही, यामध्ये भ्रष्टाचार झाल्याची शंका मनसेनं नुकतीनं व्यक्त केली होती. यापार्श्वभूमीवर शिधा कीट सामान्यांपर्यंत का पोहोचलं नाही याची तपास करणार असल्याचं, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितंल. पुण्यात युवासेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. (Sticker of Narendra Modi Eknath Shinde Devendra Fadnavis on ration card Uday Samanth gives explanation)
शिधा कीटवर असलेलं PM मोदी, CM एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्टिकर हा शासनाचा एक प्रोटोकॉल आहे. इतक्या वर्षात अशी योजना कोणीही आणली नव्हती. सरकारची कीट देण्याची दानत आहे पण ते का पोहचलं नाही याची तपासणी केली जाईल. हे कीट पोहोचायला थोडंफार मागे पुढे झालं असेल पण ते दिलं जाईल, असंही यावेळी सामंत म्हणाले.
ठाकरे कुटुंबावर आणि त्यांच्या संपत्तीवर माझी कधीही नजर नव्हती. दाऊद हा महाराष्ट्राचाच नव्हे तर देशाचा दुश्मन आहे. यासंदर्भात जी कारवाई करण्यात आली आहे त्याची माहिती माझ्याकडे नाही. त्यामुळं मी यावर भाष्य करणार नाही. पण मला कोणाच्या सल्ल्याची गरज नाही, अशा शब्दांत सामंत यांनी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांना टोला लगावला.
काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या खर्गेंना शुभेच्छा
सगळ्या राजकीय पक्षांची काम करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. जी काही निवडणूक घेतली त्यातील उमेदवार व्यक्ती वरिष्ठ आहेत. काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या खर्गेंना आमच्या शुभेच्छा आहेत काँग्रेस पुढे काय करेल हे ते ठरवतील, असंही सामंत म्हणाले. नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेवर बोलताना सामंत म्हणाले, राजकारणात काम करताना पातळी ओळखून टीका करावी. त्यांनी देखील आम्हाला कोथळा काढू, डुक्कर वैगेरे शब्द वापरले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.