पाटबंधारे कार्यालय हलविण्याच्या विराेधात आळेफाटा येथे आंदाेलन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

 पिंपळगाव जोगा पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय कार्यालय सिंचन व्यवस्थापनासाठी नारायणगाव येथून अळकुटी (ता. पारनेर) येथे हलविण्याचा शासनाने घेतलेला निर्णय जोपर्यंत रद्द होत नाही, तोपर्यंत आळेफाटा (ता. जुन्नर) येथील मुख्य चौकात आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त करीत 'राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश  उपाध्यक्ष अतुल बेनके यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

आळेफाटा  :  पिंपळगाव जोगा पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय कार्यालय सिंचन व्यवस्थापनासाठी नारायणगाव येथून अळकुटी (ता. पारनेर) येथे हलविण्याचा शासनाने घेतलेला निर्णय जोपर्यंत रद्द होत नाही, तोपर्यंत आळेफाटा (ता. जुन्नर) येथील मुख्य चौकात आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त करीत 'राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश  उपाध्यक्ष अतुल बेनके यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

पिंपळगाव जोगा पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय कार्यालय सिंचन व्यवस्थापनासाठी नारायणगाव येथून अळकुटी (ता. पारनेर) येथे हलविण्याच्या सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ, आळेफाटा (ता. जुन्नर) येथे आज सकाळी १० वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले.

दरम्यान जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने या आंदोलनात इतरही पक्ष व संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. याप्रसंगी जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पांडुरंग पवार, जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते शरद लेंडे, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष भिमाजी गडगे, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, सुरेखा वेठेकर, आशा बुचके समर्थक माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसन्ना डोके, शेतकरी संघटनेचे अंबादास हांडे, डॉ. गणपतराव डुंबरे, रमेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान जोपर्यंत हा निर्णय रद्द होत नाही तोपर्यंत आळेफाटा येथील मुख्य चौकात ठिय्या आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे अतुल बेनके यांनी स्पष्ट केले. यावेळी याबाबतचे निवेदन पाटबंधारे विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यास देण्यात आले. शासनाचा हा  निर्णय जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विरोधातील  असून, सरकारच्या या निर्णयाचा तसेच जुन्नर तालुक्यातील लोकप्रतिनिधीच्या नाकर्तेपणाचा निषेध करत असल्याचेही ते यावेळी बोलताना म्हणाले. यावेळी शरद लेंडे, पांडुरंग पवार, भिमाजी गडगे, प्रसन्ना डोके, अंबादास हांडे, डॉ. गणपत डुंबरे, अशोक घोडके आदींची भाषणे झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stike against moving the irrigation office in junnar