Video : शेणामातीत कसं काय दिवाळी करणार? मेंढपाळांच्या पालावर अजुनही अंधारच

Still No Diwali Celebration of Shepherds from Maharashtra
Still No Diwali Celebration of Shepherds from Maharashtra

पुण ः "आमची चौथी पिढी हाय, जी जनावराला घेऊन माळोरानी फिरते. यंदा पावसामुळे कांद्याचे रोप पाण्यात गेलयं. त्यामुळं लवकरच बाहीर पडाव लागलं. अशा शेणामातीत कसं काय दिवाळी करणार, कोणी आणून दिलंय तर खातो. नाहीतर आखाडानंतरच काय ते गोडधोड व्हत. पोरासोरांनी लयीच थयथयाट केला तर घेतो कपडे लत्ते! नाहीतर गरिबाला कसली आलीया दिवाळी.'' खडकी परिसरात माळरानावर पाल टाकून मेंढपाळी करणाऱ्या भिसे आजी त्यांच्या दिवाळीच स्वरूप आम्हाला सांगत होत्या. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पिढ्यान्‌पिढ्या पोटापाण्यासाठी सुगीच्या दिवसांत स्थलांतर करणाऱ्या समाजाची दिवाळी अजूनही अप्रकाशित आहे. तेव्हाच्या समाजाची गरज म्हणून घरदार सोडून गावगाडा चालण्यासाठी गावोगावी भटकणाऱ्या या समाजाच्या व्यवसायाचे स्वरूप अजूनही बदलले नाही. आधुनिक म्हणविणाऱ्या समाजाने नवी जीवन पद्धती अवगत केली परंतु, माळरानावर पाल ठोकणारे कुटुंब अजूनही यापासून दूरच आहे. दिपोत्सवाच्या प्रकाशाने अशा पालांचे कोनाडे उजडलेत का, हे जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला. अतिवृष्टीमुळे शेती आणि शेतमजुरी बुडाल्याने नेहमीपेक्षा लवकरच मेंढरे आणि शेळ्या घेऊन बाहेर पडावं लागल्याचे आजीबाई सांगतात. काल गाडीतून आलेल्या साहेबाने पोऱ्हांना कपडे लत्ते दिले. पण, इथ उघड्यावर शेणामातीत दिवाळीचं फराळ करण शक्‍य नसल्याचे, भिसे आजी सांगतात. 

पोऱ्हास्नी शिकवणार... 
शाळेत जाणाऱ्या मुलांना घरीच चुलत्याजवळ ठेवल्याचे आजी सांगतात. पिढ्यान्‌पिढ्या केलेल्या या व्यवसायातून मुलांनी बाहेर पडावे. दोन वेळच पोट भरेल, राहायला पक्के घर होईल. यासाठी त्यांना शिकवणार असल्याचेही त्या म्हणतात. त्यांच्या नशिबाने नोकरी लागली तर लागेल, नाही लागलीतर हाच धंदा करतील. पण त्यांना शिकवणारच, असा विश्‍वास भिसे आजींनी व्यक्त केला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यांची दिवाळी अशी करा गोड... 
गरीब किंवा भटके म्हणून भेटवस्तू स्वीकारताना हा समाज संकोचतो. इतरांप्रमाणे त्यांचाही हा खानदानी व्यवसाय आहे. परंतु, या व्यवसायाचे स्वरूप स्थलांतरित आणि थोडे अप्रगत आहे. अशा समाजाजवळ विक्रीसाठी असलेल्या गोष्टी आपण घेऊ शकतो. तसेच जनावर बाळगणाऱ्या कुटुंबांकडे खत, लोकर, हाताने बनवीलेल्या वस्तू, दूध आदी गोष्टी असतात. आपण पुढाकार घेऊन अशा वस्तूंच्या विक्रीसाठी मदत करू शकतो. त्यांच्या व्यवसायाला पूरक ठरेल आणि त्यातून त्यांना चार पैसे अधिक मिळतील असे प्रयत्न समाज म्हणून आपण करू शकतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com