Manchar nagarpanchyat
sakal
मंचर - मंचर (ता. आंबेगाव) नगरपंचायत हद्दीतील तीन ते चार मजली तब्बल ८५ इमारतींच्या बांधकामाबाबत कायदेशीर कागदपत्रे सादर करून खुलासा करण्याच्या नोटिसा नगरपंचायतीने बजावल्या आहेत. एक महिन्यात समधानकारक उत्तर न आल्यास नियमानुसार करवाई करण्याचा इशारा नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी अंबादास गरकळ यांनी दिला आहे.
दरम्यान, बँकेचे कर्जाचे हप्ते सुरू असलेल्या सदनिकाधारक तसेच व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.