esakal | बारामतीत रेमडीसिव्हिर इंजेक्शनची माहिती मिळणार व्हॉटसअॅप ग्रुपद्वारे
sakal

बोलून बातमी शोधा

covifor.jpg

केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने एक व्हॉटसअॅप ग्रुप तयार करण्यात आला असून या इंजेक्शनच्या साठ्याबाबत माहिती दिली जात आहे.

बारामतीत रेमडीसिव्हिर इंजेक्शनची माहिती मिळणार व्हॉटसअॅप ग्रुपद्वारे

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : शहरात रेमडीसिव्हिर इंजेक्शनबाबत काल ओरड झाल्यानंतर आज मात्र या इंजेक्शनचा पुरेसा साठा रुग्णांच्या नातेवाईकांना उपलब्ध झाला. येथील केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने एक व्हॉटसअॅप ग्रुप तयार करण्यात आला असून या इंजेक्शनच्या साठ्याबाबत माहिती दिली जात आहे. प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे तसेच अन्न व औषध विभागाचे अधिकारी विजय नांगरे यांनाही ही माहिती दिली जात आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काल रुग्णांची ओरड झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने याची दखल घेतली. या बाबत सर्वच औषध दुकानदारांशी संवाद साधला गेला व या बाबत सर्व बाबींची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्याचे विजय नांगरे यांनी सांगितले. दरम्यान या इंजेक्शनबाबत कोणीही चुकीच्या पध्दतीने व्यवहार केल्याचे निदर्शनास आल्यास त्याच्याविरुध्द कारवाईचाही इशारा नांगरे यांनी दिला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, ज्या रुग्णांच्या नातेवाईकांना या इंजेक्शनची आवश्यकता आहे, त्यांनी या ठिकाणी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर अगोदर संपर्क साधावा, ज्यांच्याकडे हे औषध असेल त्या ठिकाणी आवश्यक कागदपत्रे घेऊनच जावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. या मुळे लोकांचा अनावश्यक वेळ जाणार नाही व मनस्तापही होणार नाही. दरम्यान अन्न व औषध प्रशासन आता दैनंदिन या इंजेक्शनच्या साठ्याबाबत आढावा घेणार आहे. 

बारामतीत ज्या रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडीसिव्हिर ​इंजेक्शनची आवश्यकता आहे  अशा रुग्णांच्या नातेवाईकांनी खालील ठिकाणी अगोदर चौकशी करावी मगच इंजेक्शन खरेदीसाठी बाहेर पडावे जेणेकरुन लोकांना हेलपाटे मारावे लागणार नाही.          

•   कोठारी एजन्सीज- 9422005885
•    श्री एजन्सीज- 9822294096
•    दोशी अभयकुमार- 9850513014
•    भाग्यजय मेडीकल- 9158900735
•    लाईफलाईन मेडीको- 8275465006
•    श्री चैतन्य मेडीकल- 9960753965
•    ओंकार मेडीकल- 9850224011
•    बारामती हॉस्पिटल- 9325524409
•    आरोग्य मेडीकल- 9158516333
•    शिवनंदन मेडीकल- 9011795112
•    निरामय मेडीकल- 9823357394
•    गिरीराज हॉस्पिटल- 7620557197