स्टोनब्रीज पब्लीक स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या कलाविष्कारावर प्रेक्षक फिदा
ANR26B02908
अनगर-ः येथील स्टोनब्रीज पब्लीक स्कूलच्या बालचमूंचे रंगतदार नृत्य.
स्टोनब्रिज स्कूलच्या बालकलाकारांच्या नृत्याविष्कारास दाद
अनगर, ता. ७ ः येथील स्टोनब्रिज पब्लिक स्कूलच्या बालचमुंनी वार्षिक स्नेहसंमेलनात विविध मराठी, हिंदी गीतांवर सादर केलेल्या उत्कृष्ट नृत्याविष्काराला पालक व प्रेक्षकांनी दाद दिली.
कार्यक्रमासाठी अनगरच्या नगराध्यक्षा प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील उपस्थित होत्या. याप्रसंगी संस्थेचे मुख्य कार्यकारी आधिकारी चंद्रकांत ढोले हेही उपस्थित होते.
याप्रसंगी मुख्याध्यापिका मनीषा गवळी व अनगर नगरपंचायतीचे नगरसेवक उपस्थित होते. स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी लावणी, विनोदी उखाणे, शेतकरी गीत, देशभक्तिपर गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
स्वाती नामदे, अमृता गुंड, शाहिन शेख, सोनाली देवकते, राणी राहिगुडे, रोहिणी थिटे, काजल साळुंके व ज्योती वाघमारे आदींसह सर्व शिक्षिकांनी परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

