कोल्हापूरः केबल चोरी रोखा, शेतकऱ्यांना न्याय द्या

कोल्हापूरः केबल चोरी रोखा, शेतकऱ्यांना न्याय द्या
Published on

केबल चोरी रोखा, शेतकऱ्यांना न्याय द्या
--
शिवसेनेची मागणी : पाटबंधारे प्रकल्पांवर रखवालदार नेमा

गडहिंग्लज, जि. कोल्हापूर : पाटबंधारे प्रकल्पांवर शेतकऱ्यांनी बसविलेल्या पंपांची केबल चोरण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना हजारो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. केबल चोरीचे प्रकार रोखावेत आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी शिवसेनेतर्फे (ठाकरे गट) पोलीस उपअधीक्षकांकडे केली, तर पाटबंधारे प्रकल्पांवर रखवालदार नेमण्याबाबतचे निवेदन पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले आहे.
गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यात अनेक पाटबंधारे प्रकल्प आहेत. या प्रकल्पावरील वीज पंपांच्या केबलची चोरी होत आहे. त्याचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. या केबल चोरीची चौकशी व्हावी. तसेच चोरट्यांवर कारवाई करावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल. तसेच प्रत्येक पाटबंधारे प्रकल्पावर रखवालदाराची नियुक्ती करावी. त्यामुळे वाढत्या केबल चोरीच्या प्रकारांना आळा बसेल, असेही निवेदनात नमूद केले आहे.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, चंदगड विधानसभा क्षेत्रप्रमुख राजू रेडेकर, वसंत नाईक, संजय पाटील, प्रकाश रावळ, सुरेश हेब्बाळे, प्रकाश सासुलकर, विलास यमाटे, शैलेश इंगवले, मनिष हावळ, मारुती जाधव, संभाजी येडूरकर, दिगंबर पाटील आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com