सोलापूर-उजनीत स्फोटकांचा वापर थांबवा; निसर्गप्रेमींची मागणी

सोलापूर-उजनीत स्फोटकांचा वापर  थांबवा; निसर्गप्रेमींची मागणी
Published on

उजनीत स्फोटकांचा वापर
थांबवा; निसर्गप्रेमींची मागणी
-----
ॲग्रोवन वृत्तसेवा
केत्तूर, जि. सोलापूर : उजनी धरण परिसरातील पक्षी आणि जलचर प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे संरक्षण व्हावे, तसेच अवैध वाळू उपसा रोखताना स्फोटकांचा वापर टाळावा, अशी मागणी पक्षी अभ्यासक व निसर्गप्रेमींनी केली आहे. या बाबात करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना ‘यशकल्याणी नेचर काँझर्वेशन’च्या पुढाकाराने निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, उजनी धरण परिसर हा विविध स्थलांतरित व स्थानिक पक्षी, जलचर प्राणी तसेच समृद्ध जैवविविधतेसाठी अत्यंत महत्त्वाचा अधिवास मानला जातो. दरवर्षी हजारो पक्षी या परिसरात वास्तव्यास येतात. सद्यःस्थितीत अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी संबंधित बोटी स्फोट करून नष्ट करण्याची कारवाई केली जात आहे. मात्र, या स्फोटांमुळे परिसरातील पक्षी, मासे व अन्य जलचर प्राण्यांच्या अधिवासाला मोठा धोका निर्माण होत आहे. या मोठ्या आवाजामुळे पक्ष्यांचे स्थलांतर होत आहे, शिवाय पक्ष्यांची अंडी उबविण्याची प्रक्रिया विस्कळीत होत आहे, या स्फोटांमुळे संपूर्ण जैवसाखळीवर विपरीत परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पर्यावरण संवर्धन व जैवविविधतेच्या रक्षणासाठी प्रशासनाने या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, असे आवाहन पक्षी अभ्यासक कल्याणराव साळुंके यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com