कोरोना’ पुन्हा येईल काय पुन्हा येईल..! कसा येईल पुन्हा..?

Story of Corona Petient in Shikrapur area Pune
Story of Corona Petient in Shikrapur area Pune

शिक्रापूर : तसा ’तो’ महाआघाडीतील एका पक्षाचा कट्टर कार्यकर्ता. मुंबईतून गावाकडे आला आणि दूर्दैवाने त्याला कोरोना निष्पन्न झाला. शिक्रापूरजवळीलच एका गावात राहणा-या या कार्यकर्त्याने मुंबईतील आपल्या काही नेत्यांना सांगितल्याने तालुक्यातील प्रमुख पदाधिका-यांनीही त्याची विशेष काळजी घेण्याचे आरोग्य विभागाला सांगितले. त्याप्रमाणे त्याला पुण्यात नेणे, १४ दिवस अंडर-ऑब्झरवेशन ठेवून उपचार करणे आदी वैद्यकीय सोपस्कर पार पडले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

अखेर तो दिवस उजाडला की, ज्या दिवशी त्याचा ’डिसचार्ज’ होता. त्याने पुन्हा मुंबईत नेत्यांना फोन केला आणि नेत्यांचा फोन तालुक्यात फिरुन या गड्यासाठी डॉक्टरसह एक अ‍ॅंब्यूलन्स पुढील पाच तासांच्या आत हॉस्पिटलपुढे उभी राहिली. हा कार्यकर्ता, डॉक्टर, एक नर्स आणि अ‍ॅंब्यूलन्स-ड्रायव्हर असा सगळा ’कोरोनामुक्त’ ताफा गावाकडे निघाला. अ‍ॅंब्यूलन्स घरी आली आणि गडी हसत-हसत गाडीतून उतरला आणि थेट आईला मिठी मारली. आता एवढा भावूक क्षण म्हटल्यावर या गड्याला सोडायला आलेल्या डॉक्टरनांही त्याला विचारल्याशिवाय जाता येईना. थोडी रडा-रडी झाली आणि डॉक्टरसाहेब त्याच्यापुढे जावून आदबीने म्हणाले, ’मी निघतो आता, काळजी घ्या...’ एवढ्यावर कार्यकर्ता खुष झाला पण एवढ्यावर डॉक्टर थांबले नाही तर ते पुढे म्हणाले, काही गडबड झाली तर थेट मला फोन करा, मी पुन्हा येईन...!’

’मी पुन्हा येईन...’ या एकाच वाक्याने हा कार्यकर्ता अचानक इतका गंभीर झाला की, त्याने लगेच डॉक्टरला जवळ बोलावले आणि अक्षरश: ठाकरी भाषेत सुनावले, ’साहेब, पुन्हा येईल काय पुन्हा येईल...! कशाला पुन्हा येईल. झालं ना आता सगळं ठिक ठाक, मग पुन्हा येईल कशाला. झालं तेवढं ठिक झालं, आता मला काय नाय होत, जा इथून तुम्ही...’ हे ऐकून एवढ्या वेळ फ्रेश असलेल्या डॉक्टरांनी मुकाट काढता पाय घेतला. पण पत्रकारांना हा किस्सा सांगताना त्यांनी हे सांगितलं की, राज्याचे राजकारण हल्ली पेशंटमधी इतकं घुसलंय की, काय बोलावं आणि पेशंट काय अर्थ काढतील त्याचा नेमच राहिला नाही हो...!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com