Pune News : तळजाईच्या वनसंपदेस प्रक्रिया केलेले पाणी, पुणे महापालिका; वन विभागामधील बैठकीत सकारात्मक प्रतिसाद
Pune Municipal Corporation : विठ्ठलवाडी एसटीपीमध्ये प्रक्रिया केलेले सांडपाणी तळजाई टेकडीवरील वनस्पतींच्या सिंचनासाठी वापरण्याचा सकारात्मक निर्णय महापालिकेने घेतला आहे.
पुणे : विठ्ठलवाडीतील मैलापाणी शुद्धीकरण केंद्रात (एसटीपी) प्रक्रिया केलेले पाणी तळजाई टेकडीवरील झाडांना दिले जाणार आहे. त्यासाठी वनविभागातील अधिकाऱ्यांची महापालिकेसोबत बैठक पार पडली असून, त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.