Strawberry Crop : आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी गावांमध्ये स्ट्रॉबेरी पिक लागवड प्रयोग यशस्वी होणार - विजयकुमार गावीत

पाच गुंठे लागवडीसाठी ५० हजार रुपये अनुदान : आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावीत.
Strawberry Crop
Strawberry Crop sakal

Manchar News : “राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सतत राज्य शासनाकडे आदिवासी भागात रोजगार निर्मातीसाठी पाठपुरावा केला आहे. त्यानुसार स्ट्रॉबेरी लागवड प्रयोग यशस्वी करण्यासाठी सर्व प्रकारची मदत आदिवासी विभागाकडून उपलब्ध करून दिली जाईल.” अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावीत यांनी दिली.

मुंबई मंत्रालयात आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी गावांमध्ये स्ट्रॉबेरी पिक उत्पादना संदर्भात झालेल्या बैठकीत गावीत बोलत होते. यावेळी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, आदिवासी समाजाचे नेते सुभाषराव मोरमारे, प्रकाश घोलप, संजय गवारी,

संदिप चपटे, एकात्मिक आदिवासी प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड,जिल्हा कृषी अधिकारी संजय काचोळे, खेड उपविभागीय कृषी अधिकारी सतीश शिरसाठ, आंबेगाव तालुका कृषी अधिकारी साजना इंगळे, आदिवासी, कृषी, जलसंधारण विभागाचे उच्च पदस्थ अधिकारी, उपस्थित होते.

“स्ट्रॉबेरी लागवडीची पूर्वतयारी म्हणून कृषी विभागाने या भागातील माती परिक्षण करून घेतले आहे. तसेच आत्मा अंतर्गत शेतक-यांना महाबळेश्वर येथे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या कार्यक्रमामुळे आदिवासी भागातील शेतक-यांना भात पिकानंतर स्ट्रॉबेरी लागवड करता येणार आहे. आदिवासी लोकांचे स्थलांतर थांबून गावातच रोजगार निर्माती होणार आहे.”असे वळसे पाटील यांनी सांगितले.

“कृषी विभागाच्या माध्यमातून आदिवासी विभागाकडे स्ट्रॉबेरी लागवडीबाबतचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी व प्रत्येक आदिवासी शेतकऱ्यांला लागवडीसाठी पाच गुंठ्याला ५० हजार रुपये आदिवासी विभागाकडून प्राथमिक स्वरुपात अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. स्ट्रॉबेरी लागवडीसाठी प्रोत्साहन दिले जाईल.”

- विजयकुमार गावीत, आदिवासी विकासमंत्री.

“आदिवासी शेतक-यांच्या पडीक शेतजमीनीच्या विकासाठी वरदान ठरलेला पडकई कार्यक्रम गेली अनेक वर्षे बंद होता. हा कार्यक्रम नविन नियमावलीसह मंजूर करण्याबाबत तत्वतः मान्यता देण्यात आली आहे.त्यामुळे पडकई कामाला गती मिळेल.”

दिलीप वळसे पाटील, सहकारमंत्री.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com