बोरघरमध्ये स्ट्रॉबेरी प्रक्रियेचे प्रशिक्षण

बोरघरमध्ये स्ट्रॉबेरी प्रक्रियेचे प्रशिक्षण

Published on

फुलवडे, ता. १ : आदिवासी विकास विभागामार्फत शेतकऱ्यांना अनुदान मिळवून दिले. त्यातून शेतकऱ्यांना चांगला फायदा झाला आहे. आता या स्ट्रॉबेरीला चांगली बाजारपेठ मिळण्यासाठी प्रयत्न करून स्ट्रॉबेरीपासून चांगली उत्पादने तयार करण्यासाठी या सहा दिवसांच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा फायदा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन घोडेगावचे प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी सांगितले.

बोरघर (ता. आंबेगाव) येथे स्ट्रॉबेरी प्रक्रिया, मूल्यवर्धन प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्‌घाटन गुरुवारी (ता. २६) पार पडला.
येथील स्व. आनंद कपूर प्रशिक्षण संस्था जुने आंबेगाव येथे आदिवासी विकास विभाग अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय घोडेगाव यांच्या जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सिमॅसेस लर्निंग एलएलपी पुणे व कृषी विभाग आंबेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यास शेतकऱ्यांचा प्रतिसाद लाभला.

यावेळी देसाई म्हणाले की, माजी सहकारमंत्री तथा आमदार दिलीप वळसे पाटील यांनी सतत राज्य शासनाकडे आदिवासी भागात रोजगार निर्मितीसाठी पाठपुरावा करून स्ट्रॉबेरी लागवड प्रयोग यशस्वी केला आहे.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती मंचरचे माजी सभापती प्रकाश घोलप, प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई, साहाय्यक प्रकल्प अधिकारी सोनुल कोतवाल, संदीप पाटील, शिनोली जिल्हा परिषद सदस्या शीला लोहकरे, शिनोली पंचायत समिती सदस्या ज्योती पारधी, प्रवीण पारधी, कृषी विभागाचे अरविंद मोहरे, सकाळ ॲग्रोवन संलग्न शैक्षणिक संस्था एसआयआयएलसी चे उपसरव्यवस्थापक अमोल बिरारी, तसेच स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
प्रशिक्षणार्थींना इंडस्ट्री अनुभवासाठी थेट बारामती येथे नेण्यात येणार असल्याचे उपसरव्यवस्थापक अमोल बिरारी यांनी सांगितले. दरम्यान, वरिष्ठ व्यवस्थापक अमित मांजरे यांनी सूत्रसंचालन केले. आभार अक्षय घोरपडे यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com