
मुंढवा : मुंढव्यातील तुलसी हॉल ते महाराज सयाजीराजे गायकवाड चौकादरम्यानच्या रस्त्यावर मोकाट जनावरे फिरत आहेत. ही जनावरे अचानक वाहनांसमोर येत असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे स्थानिक नागरिक, पादचारी व वाहनचालकांना जीव धोक्यात घालून येथून प्रवास करावा लागत असल्याने या जनावरांना वेसण घालणार कोण, असा प्रश्न स्थानिक नागरिकांना पडला आहे.