पुणे - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पुणे महापालिका मेट्रो स्टेशनवर आंदोलन करून मेट्रो सेवा विस्कळित करून टाकली. पोलिसांना धक्काबुक्की करत अंगावर पेट्रोल टाकण्याचा प्रयत्न केला. हा असला धुडगूस पुण्यात खपवून घेतला जाणार नाही.
याप्रकरणाची सरकारने चौकशी करून संबंधितावर कडक कारवाई करावी अशी मागणी आमदार हेमंत रासने यांनी आज (ता. १०) विधानसभेत केली.
आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणे हा लोकशाहीचा अधिकार आहे, मात्र पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करताना मर्यादा ओलांडल्या. त्यांनी पत्रकारांशी अर्वाच्च भाषा वापरली, पोलिस उपायुक्तांच्या अंगावर पेट्रोल टाकण्याचा प्रयत्न केला, पोलिस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली.
या असंवेदनशील कृतीमुळे तब्बल दोन तास मेट्रो सेवा विस्कळित झाली. या पदाधिकाऱ्यांना शहराध्यक्षांनी पक्षातून काढून टाकले आहे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वाखाली महाराष्ट्र वेगाने प्रगती करत असताना या अराजकतेबद्दल कोणीही सहानुभूती दाखवली जाऊ नये, अशी मागणी रासने यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.