Pune News : मद्यपान करून रेल्वे प्रवास करणाऱ्यांना दणका; दोषी आढळल्यास आता थेट कारवाई

लोकल अथवा एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांमध्ये जर मद्यप्राशन करून कोणी प्रवास करत असेल तर लोहमार्ग पोलिस आता थेट कारवाई करणार.
alcohol drink in railway

alcohol drink in railway

sakal

Updated on

पुणे - लोकल अथवा एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांमध्ये जर मद्यप्राशन करून कोणी प्रवास करत असेल तर लोहमार्ग पोलिस आता थेट कारवाई करणार आहेत. त्यासाठी पोलिसांना सूचना देण्यात आल्या असून, संशयित प्रवाशांची ‘ब्रेथ ॲनालायझर’ने तपासणीदेखील केली जाणार आहे. त्यात दोषी आढळल्यास महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून कारवाई केली जाणार आहे. यासाठी लोहमार्ग पोलिसांची विशेष पथकेदेखील स्थापन झाली आहेत. जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून ही कारवाई केली जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com