esakal | पुणेकरांनो, नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई होणार 
sakal

बोलून बातमी शोधा

police

नागरिकांना सोमवारी मध्यरात्रीनंतर घराबाहेर पडता येणार नाही. नियमांचे उल्लंघन करून,  बाहेर फिरताना आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.  

पुणेकरांनो, नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई होणार 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे -  लॉकडाउनमध्ये सवलत देण्यात आलेल्या अत्यावश्‍यक सेवा व पोलिसांकडून अत्यावश्‍यक कारणासाठी पास घेतलेल्या व्यक्ती या व्यतिरिक्त अन्य नागरिकांना सोमवारी मध्यरात्रीनंतर घराबाहेर पडता येणार नाही. नियमांचे उल्लंघन करून, बाहेर फिरताना आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. लॉकडाउनच्यादृष्टीने 5 ते 6 हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त शहरात असणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

याबाबत अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक मोराळे म्हणाले, ""अत्यावश्‍यक सेवेत येणाऱ्या, सवलत देण्यात आलेल्या आणि पोलिस पास असणाऱ्यांनाच बाहेर जाण्यास परवानगी असेल. त्यांनाही स्वतःजवळ ओळखपत्र बाळगणे बंधनकारक असेल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे पोलिसांच्या सेवा कार्यप्रणालीद्वारे डिजिटल पास देण्याचे काम पूर्वीप्रमाणेच सुरू राहील. अत्यावश्‍यक सेवेत येणाऱ्या लोकांव्यतिरिक्त पास घेणे आवश्‍यक आहे. पूर्वीप्रमाणेच वैद्यकीय गरज व मृत्यू या कारणासाठी तत्काळ पास दिला जाईल, असे गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त बच्चन सिंग यांनी सांगितले. 

loading image
go to top