

उरुळी कांचनमध्ये कचरा टाकाल तर याद राखा! तिसऱ्यांदा सापडल्यास थेट नळ कनेक्शन कापणार; ग्रामपंचायतीचा 'कॅमेरा वॉच' आणि दंडात्मक कारवाई सुरू
Sakal
सुनील जगताप
उरुळी कांचन : उरुळी कांचन येथे कोठेही कचरा टाकून गाव घाण करणाऱ्या नागरिकांवर कॅमेऱ्याची नजर!,कोठेही कचरा टाकणारास होणार ५०० रुपये दंड.उरुळी कांचन येथील नागरिक अनेकदा सांगूनही घरातील कचरा दारात येणाऱ्या घंटागाडीत न टाकता, कामावर जाताना कोठेही टाकून गावाला विद्रूप स्वरूप आणत आहेत.