कर्फ्युची कडक अंमलबजावणी 

curfew-pune
curfew-pune
Updated on

पुणे - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण पुणे शहर 27 एप्रिलपर्यंत सील करण्यात आले आहे. त्यानुसार सोमवारपासून नागरिकांना शहरात संचार करण्यास सक्त मनाई (कर्फ्यु) आदेश लागू करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याची कडक अंमलबजावणी करण्यास सुरवात केली आहे.

दरम्यान, अत्यावश्‍यक सेवेची दुकाने काही तास सुरू आहेत, तर ऑनलाइन व घरपोच सेवांच्या वेळाही बदलल्या आहेत. वाहतूकबंदीची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे, असे पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी आदेशात नमूद केले आहे. 

कोरोनाचा विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पोलिसांनी यापूर्वीच शहरात संचारबंदी केली होती. तरीही नागरिक विनाकारण घराबाहेर पडत असल्याने कोरोना बाधितांची संख्या वाढली आहे. प्रशासन सर्वोतपरी प्रयत्न करत असतानाही रुग्ण संख्या वाढीचा वेग थांबविण्यात यश येत नसल्याची सद्यस्थिती आहे. या सगळ्या कारणांचा विचार करून, संपूर्ण शहर 27 एप्रिलपर्यंत सील केले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शहरात सोमवारी दुपारी दोनपासून पुढील सात दिवस म्हणजेच 27 एप्रिल मध्यरात्री 12 पर्यंत कर्फ्यु लागू करण्यात आला आहे. पोलिसांनी यापूर्वीच्या काही नियमांमध्ये काही प्रमाणात बदल केले आहेत. 

यांना आहे सूट 
*अत्यावश्‍यक सेवा (दूध, दुग्धोत्पादन, किराणा, फळे, भाजीपाला आदी) 
त्यांच्या वाहतुकीसाठी कोणतेही निर्बंध नसून, त्यासाठी डिजीटल पासची गरज नाही. 

* जीवनावश्‍यक वस्तू विक्रेते ( दूध, दुग्धोत्पादन, किराणा, फळे, भाजीपाला, घरगुती गॅस सिलेंडर, पेट्रोल पंप, रेशन दुकान) 

* इतर अत्यावश्‍यक सेवेशी संबंधित व्यक्तीबाबत पोलिस, शासनाचे इतर विभाग, कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी पास व परस्परपूरक यंत्रणा निर्माण केली आहे. ती पुढील मनाई कालावधीत सुरू राहील. 

* मनाई आदेश यांना लागू नसतील 

संरक्षण दल, आरोग्य विभाग, दवाखाना, औषधालय, अत्यवस्थ रुग्णाची वाहतूक, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना संबंधीत महापालिका व इतर शासकीय विभागांच्या सेवा, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी (कर्फ्यु पाससह), पोलिस सहआयुक्त यांच्याकडून परवानगी दिलेल्या व्यक्ती (पोलिसांकडून दिलेले डिजिटल पासधारक). 

* पोलिसांनी जाहीर केलेले नवीन नियम 

- जीवनावश्‍यक वस्तू व सेवा (दूध व दुग्धोत्पादन, किराणा माल, फळे व भाजीपाला) पुरविणारे केंद्रे दिवसभरात केवळ चार तास म्हणजेच सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत सुरू ठेवण्याची परवानगी. 

- जीवनावश्‍यक वस्तू विक्रेते 
- ई- कॉमर्स 
-घरपोच किराणा माल, फळे व भाजीपाला तसेच जीवनावश्‍यक वस्तूंचे वितरण करण्यासाठी फिल्पकार्ड, अमेझॉन तसेच इतर ऑनलाईन सेवा देणाऱ्या उद्योगांना सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत कामे करता येणार आहेत. त्याच वेळेत त्यांनी सेवा द्यायची आहे. 

- खाद्यपदार्थ वितरणासाठी बिग बास्केट, स्वीगी झोमॅटो तसेच इतर ऑनलाइन सेवा देणाऱ्या उद्योगांना सकाळी 10 ते दुपारी 3 आणि सायंकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत सेवा देता येणार आहे. 

- अत्यावश्‍यक व तातडीची औषधे ग्राहकांना घरपोच देण्यासाठी 24 तास सूट असणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com