esakal | सरकारी पातळीवर कडक नियमावली; तरीही महापालिकेच्या दवाखान्यातून रेमडेसीवीरचे प्रिस्क्रिप्शन

बोलून बातमी शोधा

सरकारी पातळीवर कडक नियमावली; तरीही महापालिकेच्या दवाखान्यातून रेमडेसिव्हीरचे प्रिस्क्रिप्शन
सरकारी पातळीवर कडक नियमावली; तरीही महापालिकेच्या दवाखान्यातून रेमडेसिव्हीरचे प्रिस्क्रिप्शन
sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोथरुड : महापालिकेच्या बाणेर येथील कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या आमच्या कार्यकर्त्याला रेमडेसीवीर इंजेक्शन बाहेरुन आणा अशी चिठ्ठी तेथील डॉक्टरांनी दिली आहे. रेमडेसिव्हीर इंजेक्शन वाटपासंदर्भात सरकारी पातळीवर कडक नियमावली असतानाही महानगरपालिकेच्या दवाखान्याबाबत हे कसे घडू शकते? असा प्रश्न मनसेचे राम बोरकर यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा: उद्यापासून 18 ते 45 वयोगटालीत लसीकरण नावालाच!

विजय पालकर हे गेले चार दिवस बाणेर येथे कोविडवर उपचार घेत असून तब्येत बिघडल्याने त्यांच्यावर उपचारासाठी २ रेमडेसिव्हीर व १ टॉकलिझमॅब हे इंजेक्शन आणायला नातेवाईकांना सांगितले. त्यांच्यासाठी प्लाझ्मा मागवताना रक्तगट कोणता याचा उल्लेखही करण्यात आलेला नाही. या प्रकारामुळे चिडलेल्या राम बोरकर यांनी कोविड सेंटर हे लुटमार करण्यासाठी उभारले आहे अशी मनात शंका येत असल्याचे सांगितले. महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर संजीव वावरे म्हणाले की, बाहेरुन इंजेक्शन आणायला सांगू नये. आपल्याकडे १८०० रुग्ण दाखल आहेत. पण इंजेक्शन १०० मिळालेत. अनेकदा रुग्णाचे नातेवाईक सुध्दा रेमडेसिव्हीर इंजेक्शन द्या असा आग्रह करतात. जो जास्त अत्यवस्थ आहे त्याला प्राधान्याने इंजेक्शन दिले जाते. सरकारी व खाजगी रुग्णालयात या इंजेक्शनचा तुटवडा आहे.