esakal | पुणे शहरात कोरोनाचे कडक निर्बंध; नागरिकांची फार्महाऊसला वाढती पसंती 
sakal

बोलून बातमी शोधा

Farmhouse

शहरातील मर्यादित जागेत अडकून राहण्यापेक्षा अनेक नागरिकांनी सह्याद्रीच्या कुशीत फार्महाऊसमध्ये येऊन राहण्यास पसंती दिली आहे.

पुणे शहरात कोरोनाचे कडक निर्बंध; नागरिकांची फार्महाऊसला वाढती पसंती 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

किरकटवाडी : कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागल्यामुळे शहर आणि आजूबाजूच्या परिसरात प्रशासनाने कडक निर्बंध जारी केले आहेत. अशा परिस्थितीत शहरातील मर्यादित जागेत अडकून राहण्यापेक्षा अनेक नागरिकांनी सह्याद्रीच्या कुशीत फार्महाऊसमध्ये येऊन राहण्यास पसंती दिली आहे. आरोग्याच्या काळजीपोटी शहरातील गर्दीपासून दूर येऊन नागरिक ग्रामीण जीवनशैलीचा आनंद घेताना दिसत आहेत. पुणे शहराच्या पश्चिम बाजूस खडकवासला, गोऱ्हे बुद्रुक, डोणजे, गोऱ्हे खुर्द, खानापूर, मणेरवाडी, मालखेड, निगडे, वरदाडे, सोनापूर, आंबी, कुरण, पानशेत व परिसरात शहरातील अनेक उद्योजक, व्यावसायिक, अधिकारी व नोकरदार यांनी जागा खरेदी करून फार्महाऊस बांधले आहेत. सह्याद्रीची पर्वतरांग, सिंहगड किल्ला, खडकवासला-पानशेत-वरसगाव ही धरणे, विविधतेने नटलेली वनराई व भौतिक सुविधांची उपलब्धता अशा अनेक आकर्षणांमुळे नागरिकांची या भागाला नेहमीच पसंती मिळालेली आहे. सध्या शहरामध्ये दररोज सरासरी पाच हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. ती आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने अनेक कडक निर्बंध घातले आहेत. अशावेळी अनेक नागरिकांनी संपूर्ण परिवारासह पूर्णवेळ फार्महाऊसमध्ये जाऊन राहण्यास पसंती दिलेली दिसत आहे. फार्महाऊसच्या आजूबाजूला असलेल्या जागेत भाजीपाला पिकवणे, बागकाम करणे, आणि दुपारच्या वेळी झाडाच्या सावलीत विश्रांती घेणे अशाप्रकारे नागरिक वेळ घालवताना दिसत आहेत. 

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये नागरिक आरोग्याबाबत अधिक दक्ष आहेत. फार्महाऊसमध्ये येऊन राहिल्यामुळे संपूर्ण परिवार कोरोनापासून सुरक्षित असल्याची भावना मनामध्ये निर्माण होते. १९९६ सालापासून आम्ही आमच्या फार्महाऊसमध्ये वेळ मिळेल तसे यायचो, परंतु सध्या शहरात निर्बंध असल्यामुळे आम्ही परिवारासह अधिक वेळ फार्महाऊसवर घालवत आहोत. 
- समीर मुलानी, व्यावसायिक. 

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

घरातील लहान मोठे सर्वजण फार्महाऊसवर रमले आहेत. मोकळी हवा, शेतातील निरोगी भाजीपाला, पाळलेल्या गाईचे दूध, चालण्या-फिरण्यासाठी मोकळी जागा यामुळे शहरात कोंडून राहण्यापेक्षा येथे प्रसन्न वाटते आणि आरोग्यही चांगले राहते. 
- सुभाष लोढा, उद्योजक. 

loading image