Kalyani Nagar Accident : पुणेकरांच्या तीव्र प्रतिक्रिया...फक्त सामान्य नागरिकांनाच कायदे लागू आहेत का?

अल्पवयीन संशयित आरोपीला काही तासांत जामीन मंजूर होणे, त्याची सुटका होणे, त्याला वाहतूक पोलिसांसह १५ दिवस काम करण्याची शिक्षा मिळणे, निबंध लिहिण्यास सांगणे अशा घडामोडींमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवरून पुणेकरांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे.
Kalyani Nagar Accident
Kalyani Nagar Accident sakal

अल्पवयीन संशयित आरोपीला काही तासांत जामीन मंजूर होणे, त्याची सुटका होणे, त्याला वाहतूक पोलिसांसह १५ दिवस काम करण्याची शिक्षा मिळणे, निबंध लिहिण्यास सांगणे अशा घडामोडींमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवरून पुणेकरांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठविली आहे. वाचकांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केलेल्या निवडक प्रतिक्रिया

त्या मुलाला ताबडतोब जामीन मंजूर झाला, पण ते दोन जीव गेले त्याचे काय ? अपघात कायद्यात सुधारणा व्हायला पाहिजे.

- सागर देशमुख

१८व्या वर्षी एवढी मजा करतो म्हणजे काय? गरिबांना भावना आहेत की नाही?

- सचिन

आपल्या मुलांवर चांगले संस्कार न करणाऱ्या, त्यांना चांगले वळण न लावणाऱ्या पालकांनाच शिक्षा करायला हवी.

- सूरज हेडगे

हे म्हणजे दोन खून करा आणि ट्रॅफिकवाल्यांसोबत शिट्ट्या मारा. लोकांचा जीव इतका स्वस्त कुणी केला आहे ?

- आर्विका देसाई

अपघातावर निबंध लिहिला, मानसोपचार घेतले. याची सर्व खोटी कागदपत्रे ‘मॅनेज’ करणे फारच सोपे आहे.

- मंदार उदास

रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या पबवर बंदी घालण्याची सरकारची हिंमत नाही.

- इरा

हे गतिमान सरकार आहे. गुन्हेगाराला लगेच जामीन मिळतो.

- अनिल वाघ

‘न्याय’ फक्त धनदांडग्यांना मिळतो. याच्या ठिकाणी एखादा गरीब असता तर कमीत कमी १५ दिवस तुरुंगात गेला असता.

- प्रवीण साबळे

रविवारची सुट्टी असूनही १५ तासांच्या आत मुलाला जामीन मिळाला. फारच अतिजलद सोय आहे.

- सचिन शहा

तो कारचालक अल्पवयीन आहे, तर त्याला गाडी चालवायला देणाऱ्या वडिलांवर काय कारवाई झाली?

- विष्णू टिळेकर

गेल्याच आठवड्यात झालेल्या मतदानासाठी दिलेली पक्षिय देणगी शेवटी अशा प्रकारे कामाला येत असतेच.

- रोहन

विद्यमान पोलिस आयुक्त खूप कर्तव्यदक्ष आहेत. मग उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, निरीक्षक यांना त्यांच्या हद्दीत रात्री काय चालते याची माहिती नाही का?

- अनिल

पुण्यात सर्व परमीट रूम, बिअर बार वर्षभर पहाटे दीड ते दोनपर्यंत सर्रास सुरू असतात.

- हरीश कावतकर

स्थानिक रहिवाशांकडून सर्व यंत्रणांना वेळोवेळी कल्पना देऊनही काहीच फरक पडत नसेल तर मग करायचे तरी काय?

- चंद्रकांत खोपडे

दोन होतकरू तरूणांपेक्षा धनाढ्य बापाचा एक उनाड मुलगा महत्त्वाचा वाटतो.

- रघुनाथ शिळमकर

काही ठिकाणी पोलिस १२ वाजता गाडीतून येऊन दुकान बंद करायला लावता. त्याचा इतरांना त्रास होत नसला तरी नियमावर बोट ठेवले जाते.

- राजकुमार गांधी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com