
पुणे : ‘‘पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून अहवाल सादर करा. धोकादायक इमारतींची तपासणी करण्यासह धरणांतून होणाऱ्या विसर्गाच्या आधी नदीपात्रालगत राहणाऱ्या नागरिकांना सावध करावे. समन्वय साधून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवा,’’ अशा स्पष्ट शब्दांत विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रशासनाला निर्देश दिले.