दौंड - दौंड शहरात एका विद्यार्थ्याला महाविद्यालयात आणि भरचौकात वीस जणांच्या जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. शिक्षक दिनाचा कार्यक्रम सुरू असताना ही मारहाणीस सुरवात झाली होती..शहरातील एका महाविद्यालयात ४ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त वर्गात कार्यक्रम सुरू असताना हा प्रकार घडला. जवाद शेख याने पीडित विद्यार्थ्यास अन्य आसनावर जाऊन बसण्याचे दराडवून सांगितले होते. त्यास नकार दिल्याने जवाद याने शिवीगाळ करीत त्या विद्यार्थ्याला मारहाण केली..त्यानंतर जवाद शेख याच्याबरोबर असलेल्या मोन्या शेख, अरमान शेख, फरहान शेख, इरशाद शेख व इतरांनी विद्यार्थ्याला महाविद्यालयापासून चौकात मारत आणले. चौकात विद्यार्थ्याच्या डोक्यात, छातीत व नाकावर लोखंडी हत्याराने मारहाण करून त्याला लाथाबुक्क्यांनी तुडवत जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे..दरम्यान विद्यार्थ्याचे काका घटनास्थळी पोचल्यावर त्यांनी मारहाण थांबविण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही जातीवाचक शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. दौंड पोलिस ठाण्यात या प्रकरणी पीडित विद्यार्थ्याने फिर्याद दिली आहे..फिर्यादीनुसार जवाद शेख, अरमान शेख, फरहान शेख, इरशाद शेख, मोनोद्दीन उर्फ मोन्या फरीद शेख (सर्व रा. खाटीक गल्ली, दौंड) व त्यांच्यासमवेत असणारे अन्य १५ जणांविरूध्द घातक हत्यारांनी इच्छापूर्वक दुखापत करणे, दंगा करणे आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे..पीडित विद्यार्थ्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मारहाण करणार्या तीन तरूणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अन्य संशयित फरार झाले आहेत..चौकात पोलिस नाहीगणेशोत्सवाच्या काळात दौंड शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठ, सार्वजनिक मंडळे आणि संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त आवश्यक असताना तो बंदोबस्त काल नव्हता. भरचौकात वीस जणांचा एक जमाव तब्बल दहा मिनिटे एका विद्यार्थ्याला महाविद्यालयापासून चौकापर्यंत तुडवत असताना चौकात एकही पोलिस अंमलदार उपस्थित नव्हते. पोलिस सोईने गस्त घालत असल्याने समाजकंटकांना भीती राहिलेली नाही..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.