बस अपघातातील विद्यार्थ्यांची दिलीप वळसे-पाटील यांच्याकडून चौकशी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dilip Walse Patil

मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या २० विद्यार्थ्यांची गुरुवारी (ता.२९) माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भेट घेऊन अस्थेवाईकपणे चौकशी केली.

बस अपघातातील विद्यार्थ्यांची दिलीप वळसे-पाटील यांच्याकडून चौकशी

मंचर - मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या २० विद्यार्थ्यांची गुरुवारी (ता.२९) माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भेट घेऊन अस्थेवाईकपणे चौकशी केली.

'पिंपळगाव घोडे (ता.आंबेगाव) येथील मुक्ताई प्रशाला या हायस्कूलचे विद्यार्थी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व चालक असे एकूण ५० जण बस मधून येत असताना बस दरीत कोसळली. झालेल्या अपघातातील २० विद्यार्थ्यांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यामध्ये तीन विद्यार्थिनीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.' अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ.अंबादास देवमाने यांनी वळसे पाटील यांना दिली. समवेत विद्या विकास मंडळ संस्थेचे अध्यक्ष अजित काळे, जयसिंग काळे, बाळासाहेब बाणखेले, अँड मुकुंद काळे अरुणा दत्तात्रेय थोरात, सुहास बाणखेले, अल्लू इनामदार सुरेश निघोट समवेत होते.

त्यानंतर अवसरी खुर्द (ता.आंबेगाव) येथे भैरवनाथ विद्यालयात कोयत्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या कुणाल कराळे याच्याबरोबरही वळसे पाटील यांनी संवाद साधून त्याला व कुटुंबियांना धीर दिला. मुक्ताई प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या पालकांबरोबर वळसे पाटील यांनी चर्चा केली. ते म्हणाले “येथे उत्तम आरोग्यसेवा उपलब्ध आहेत. मुलांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. येत्या चार ते पाच दिवसात विद्यार्थी बरे होतील.'