विद्यार्थी मेळाव्यातून रोजगारनिर्मिती

नीलम कराळे
मंगळवार, 17 एप्रिल 2018

पुणे - कॉलेजच्या शेवटच्या वर्षाचे विद्यार्थी ‘कॅम्पस इंटरव्ह्यू’ची वाट पाहतात. तसेच नोकरीसंबंधी अद्ययावत माहिती देणाऱ्या संकेतस्थळावर नोंदणी करतात. आता माजी विद्यार्थी मेळाव्यालाही आवर्जून उपस्थित राहा. कारण, बदलत्या काळात माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यातूनही कॉलेजमधील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत.

विद्यालयांमधील माजी विद्यार्थी मेळावा केवळ जुन्या मित्र-मैत्रिणींना भेटणे, त्यांच्याशी गप्पा मारण्यापुरताच मर्यादित राहिला नाही. बहुतांश माजी विद्यार्थ्यांनी स्वतःचे उद्योग सुरू केलेले असतात. काही जण बड्या कंपनीत उच्च पदावर असतात. त्यामुळे त्यांच्या उद्योगाची गरज लक्षात घेऊन आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना संधी देण्याकडे माजी विद्यार्थ्यांचा कल असतो.

असा मिळतो रोजगार
 स्टॉलची सोय
 स्टॉलमधून व्यवसाय निवड
 होतकरू विद्यार्थ्यांना संधी 

विद्यार्थ्यांचे योगदान
 उद्योग क्षमता दाखविण्याची संधी
 प्रकल्प सादरीकरणास वाव 

व्यवसायात आपल्याच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अशा मेळाव्यातून सहभागी करून घेत आहे. यामुळे व्यवसायवृद्धी तसेच संपर्कात वाढ होते. यामुळे योग्य विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी मिळत आहे. 
- पद्मावती ओक, व्यावसायिक व माजी विद्यार्थिनी.

महाविद्यालयात आजी माजी विद्यार्थ्यांसाठी एक चांगले व्यासपीठ म्हणून या मेळाव्याचे आयोजन केले जात आहे. या वेळी मनोरंजनासोबतच कौशल्य विकासाचे व रोजगार क्षमता वाढवणारे उपक्रम राबवले जातात. तसेच यासाठी माजी विद्यार्थी पुढाकार घेत आहे. 
- गुरुनाथ पवार, आयोजक

माजी विद्यार्थी मेळावा जरी एक दिवसाचा असला तरीही त्यातील उपक्रम आजी माजी विद्यार्थ्यांसाठी संधी म्हणून काम करतात. यामुळे विद्यार्थ्यांना नोकरी, व्यवसायाच्या संधी उपलब्ध होत आहेत.  
- रितेश ओसवाल, संपर्कप्रमुख

Web Title: student campaign employment generation