राहू - बेडरूममध्ये नायलॉनच्या रसीने गळफास घेऊन तरुणीने संपविले जीवन. ही घटना राहू नजीक सोनवणे मळा (ता. दौंड) येथे आज (ता. ८) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. प्रणाली मधुकर नवले (वय-१९) असे जीवन संपविलेल्या मुलीचे नाव आहे. यासंदर्भात प्रणालीचा भाऊ प्रणव मधुकर नवले याने यवत पोलिसांना खबर दिली.