student Exam Fee Waiver
sakal
- प्रज्वल रामटेके
पुणे - दुष्काळामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, यासाठी राज्य सरकारने दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना जाहीर केलेल्या परीक्षा शुल्कमाफीचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील तब्बल ६५ हजार २०० विद्यार्थ्यांनी ‘शून्य शुल्क’ (झिरो चलन) पर्यायाद्वारे एकही रुपया न भरता परीक्षा अर्ज दाखल केले आहेत. तर राज्यात आतापर्यंत २६ विद्यापीठांमधील दोन लाख ४० हजार ३६५ विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घेतला असून, मुंबई विद्यापीठानेही सुमारे सव्वातीन कोटी रुपये परताव्याची प्रक्रिया सुरू केली आहे.