पुण्यात विद्यार्थ्यांना गोवर रुबेला लसची अॅलर्जी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

पुणे : केंद्र सरकारक़डुन दिल्या जाणाऱ्या गोवर रुबेला लसची अॅलर्जी झाल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. गोवरवर मात करण्यासाठी देशभरात केंद्र सरकारने रुबेला लस देण्याची मोहिम सुरु केली अाहे. एक महिन्यापासुन ते पंधरा वर्षापर्यतच्या मुलांना ही लस दिली जाणार आहे.
 
दरम्यान, पुण्यात या लसीची अॅलर्जी झाल्याची घटना समोर आली आहे. अगरवाल शाळेतील शालेय मुलांना ही लस दिल्यानंतर काही तासातच त्यांना उलट्यांचा त्रास सुरु झाला. त्यांना दत्तवाडी परिसरातील ग्लोबल हाॉस्पिटलमध्ये तातडीने दाखल करण्यात आले सध्या त्यांची तब्येत स्थिर असुन त्याच्यावर डॉक्टर उपचार करत आहे.

''मुलांनी पोटभर डबा खाल्ला नव्हता. त्यामुळे लस दिल्यानंतर काहींना मळमळ आणि उलट्याचा त्रास झाला. खबरदारीचा उपाय म्हणून जवळ असलेल्या रूग्णालयतात मुलांना दाखल केले आहे. त्यातील मुलांना कोणताही धोका नाही.'' अशी माहिती महापालिकेचे लसीकरण अधिकारी डाॅ. शहा यांनी दिली.

Web Title: student got allergic due to gover rubella vaccination in pune