pushkar shingade
sakal
राजगुरुनगर - दोन-तीन महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणातून दहावीच्या विद्यार्थ्याने खासगी शिकवणी वर्गातील सहाध्यायी विद्यार्थ्याचा शिकवणी सुरू असतानाच धारदार शस्त्राने मानेवर आणि पोटावर वार करून निर्घृण खून केल्याची घटना राजगुरुनगर (ता. खेड) येथे सोमवारी (ता. १५) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. पुष्कर दिलीप शिंगाडे (वय १६, रा. वाडा रोड, राजगुरुनगर) असे खून झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.