मलठण येथील विद्यार्थ्यांनी अनुभवला आठवडा बाजार
कवठे येमाई, ता. १४ : विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानाचा अनुभव मिळावा यासाठी मलठण (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत शुक्रवारी (ता. १३) ‘आठवडा बाजार’ आणि ‘बालआनंद मेळावा’ उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांनी थाटलेल्या विविध स्टॉल्सना ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी मेथी, कोथिंबीर, शेपू यांसारख्या पालेभाज्या, फळे आणि घरगुती खाद्यपदार्थांची विक्री केली. वजनकाटा हाताळणे, पैशांचा हिशेब ठेवणे आणि ग्राहकांशी संवाद साधणे यातून मुलांनी खरेदी-विक्रीचे व्यवस्थापन प्रत्यक्ष अनुभवले. या वेळी सरपंच माधुरी थोरात, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नवनाथ वाव्हळ, उपाध्यक्षा दिपाली दंडवते, उद्योजक सागर दंडवते, माजी सरपंच रामचंद्र गायकवाड, मुख्याध्यापक पाटीलबुवा मिडगुले यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

