शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विद्यार्थ्याची वस्तीगृहात गळफास घेऊन आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kanhaiya Kale

शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात विद्युत विभागात पहिल्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्याने वसतिगृहामध्ये असलेल्या खोलीमध्ये पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.

शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विद्यार्थ्याची वस्तीगृहात गळफास घेऊन आत्महत्या

मंचर - आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात विद्युत विभागात पहिल्या वर्गात शिकत असलेला विद्यार्थी कन्हैया तानाजी काळे (वय-१८, रा. पंढरपूर, जि. सोलापूर) याने गुरुवारी (ता. १३) वसतिगृहामध्ये असलेल्या खोलीमध्ये पंख्याला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे विद्यार्थी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश होळकर यांच्यासह पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी भेट दिली आहे. होडगर म्हणाले, 'प्राथमिक चौकशी केली आहे. सदर खोलीची पाहणी केली आहे. ता. १७ ऑक्टोबर व ता. १८ ऑक्टोबर रोजी इंग्रजी, विज्ञान व गणित या विषयाची युनिट टेस्ट होती. कन्हैयाला गणित जमत नव्हते त्यामुळे तो बुधवारी (ता.१२) टेन्शनमध्ये होता. असे त्याचे रूममेट यांनी सांगितले. गुरुवारी सकळी पोटात दुखत आहे. असे कारण सांगून कन्हैया कॉलेजला न जाता रूममध्येच थांबला. सकळी नऊ ते तीन या वेळेत कन्हैयाने आत्महत्या केली. असावी असा प्राथमिक अंदाज आहे.

दरम्यान, काळे यांचा मृतदेह सेवेचरणासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला आहे.

टॅग्स :studentCollege