esakal | एमपीएससी परीक्षेत पात्र विद्यार्थ्यांच्या प्रमाणात वाढ करण्याची ‘स्टुडंट्स राईट्स’ने केली मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

MPSC

एमपीएससी परीक्षेत पात्र विद्यार्थ्यांच्या प्रमाणात वाढ करण्याची ‘स्टुडंट्स राईट्स’ने केली मागणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोनामुळे महाराष्ट्र राज्य लोकसेवेच्या परीक्षा वारंवार पुढे ढकलल्या आहेत. विद्यार्थ्यांनी तणावात परीक्षा दिल्याने त्याचा परिणाम निकालावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्रीय परीक्षेच्या धर्तीवर पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरविण्याचे प्रमाण १ः१४ ऐवजी १ः२५ असे करावी, अशी मागणी अशी मागणी एमपीएससी स्टुडंट्स राईट्सचे महेश बडे आणि किरण निंभोरे यांनी आयोगाकडे केली आहे.

काही उमेदवार गेल्या चार-पाच वर्षांपासून अभ्यासाची तयारी करीत आहेत. कोरोनामुळे त्यांचे एक वर्ष वाया गेले आहे. विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणीसह वय वाढणे, मानसिक त्रास, करिअरमध्ये कमी झालेल्या संधी या कारणाने पुन्हा परीक्षा देता येणार नाही. त्यामुळे आयोगाने याबाबत सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे. गेल्या दोन वर्षांत परीक्षा झालेली नसल्याने परीक्षेसाठीचे वय वाढविल्यास फायदा होईल, त्यामुळे याचा विचार करणे गरजेचे आहे.

पूर्व परीक्षेतील गुण हे स्पर्धा परीक्षेमध्ये ग्राह्य धरले जात नाहीत, ही परीक्षा केवळ चाळणी म्हणूनच उपयुक्त आहे. केंद्रीय स्तरावरील परीक्षांमध्ये देखील पूर्व परीक्षेतील उत्तीर्णाचे प्रमाण १ : २५ असेच आहे. एमपीएससीद्वारे घेतल्या जाणाऱ्या राज्य सेवा पूर्व परीक्षा, संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र अभियांत्रिकी पूर्व सेवा या परीक्षेत हेच उत्तीर्णतेचे प्रमाण १ : १४ ऐवजी १ः२५ करणे अपेक्षित आहे, असे बडे व निंभोरे यांनी सांगितले.

loading image
go to top