मसूर: विद्यार्थी म्हणून शिकाल तरच जीवनात यशस्वी व्हाल ; सुनिल शिखरे.

मसूर: विद्यार्थी म्हणून शिकाल तरच जीवनात यशस्वी व्हाल ; सुनिल शिखरे.

Published on

विद्यार्थी म्हणून राहिलात, तरच यशस्वी व्हाल

सुनील शिखरे; कवठेतील ‘ज्योतिर्लिंग’मध्ये मार्गदर्शन

मसूर, ता. १६ : विद्यार्थी म्हणून शिक्षण घेतले, तर जीवनात यशस्वी व्हाल; परंतु परीक्षार्थी म्हणून शिक्षण घेतल्यास फक्त परीक्षेत यशस्वी व्हाल. मात्र, जीवनात यशस्वी व्हाल, याची खात्री देता येणार नाही, असे प्रतिपादन जिल्हा प्राथमिक व माध्यमिक वेतन व भविष्य निर्वाह निधी विभागाचे अधीक्षक सुनील शिखरे यांनी केले.

कवठे (ता. कऱ्हाड) येथील श्री ज्योतिर्लिंग विद्यालयात कोल्हापूर विभागीय मंडळाच्या उपक्रमांतर्गत दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. मुख्याध्यापक प्रदीप पाटील, कालगावच्या श्री समर्थ हायस्कूलचे मुख्याध्यापक जगन्नाथ कुंभार आदी उपस्थित होते.

श्री. शिखरे म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकसित व्हावी, यादृष्टीने विभागीय मंडळाने विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. आज काही विद्यार्थी दुहेरी पदवी घेऊनही सुशिक्षित बेकार आहेत. ते आपल्यातला दोष न पाहता व्यवस्थेला नाव ठेवतात. विद्यार्थी म्हणून शिक्षण घेतलेला मुलगा कधीही वाया जात नाही. तो विविध पर्यायांचा आधार घेत यशस्वी होत आहे. एखादी चांगली गोष्ट करताना अंतर्गत आणि बहिर्गत असे दोन्ही प्रकारचे अडथळे निर्माण हाेतात. तंत्रज्ञानातील बदलांचा वेग जसा वाढत गेला तसेच सामाजिक परिवर्तन ही गतिमान होत गेले आहे. आज आपण एआयच्या युगात प्रवेश केला आहे. या सर्व माध्यमांचा वापर स्वतःच्या प्रगतीसाठी करून घेतला पाहिजे.’’

मुख्याध्यापक कुंभार म्हणाल्या, ‘‘समयसूचकता जीवनात खूप महत्त्वाची आहे. एकदा संधी व वेळ निघून गेली, की पुन्हा पश्चात्ताप करण्याशिवाय काहीही उरत नाही.’’
मुख्याध्यापक प्रदीप पाटील यांनी प्रास्ताविक केले. दिलीप माने यांनी सूत्रसंचालन मानले.


B02449
कवठे : विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सुनील शिखरे. त्या वेळी जगन्नाथ कुंभार, प्रदीप पाटील, दिलीप माने आदी.
................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com