पुण्यात अडकलेले विद्य़ार्थी...राज्य सरकार...अन् काय झाला 'तो' निर्णय  

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 मे 2020

एका तिकिटासाठी दुप्पट तिकीट मोजावे लागत असल्याने विद्यार्थी संतप्त झाले आहेत.सरकारने आम्हाला गंडविले आहे,आम्ही घरी जायचे कसे,असा सवाल पुण्यात अडकलेल्याविद्यार्थ्यांनी केला आहे

पुणे : "राज्यातील मजूर, विद्यार्थी यांच्यासाठी मोफत एसटी बससेवा सुरू करण्याची घोषणा सरकारने केली होती. मात्र सरकारने यात विद्यार्थ्यांना दिलासा न देता उलट एका तिकिटासाठी दुप्पट तिकीट मोजावे लागत असल्याने विद्यार्थी संतप्त झाले आहेत. सरकारने आम्हाला गंडविले आहे, आम्ही घरी जायचे कसे, असा सवाल पुण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांनी केला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्यात स्पर्धा परीक्षा व इतर शिक्षण घेणारे 3 हजारपेक्षा जास्त विद्यार्थी अडकून पडले आहेत. या सर्वांना घरी जायची आस लागलेली आहे. पुण्यात एकट्याने रहावे लागत असल्याने विद्यार्थी मानसिक तणावात आहेत. सरकारने 'कोटा'तील विद्यार्थ्यांप्रमाणे आम्हालाही घरी सोडावे, अशी मागणी गेल्या एका आठवड्यापासून ते करत आहेत. 11 मे पासून मोफत एसटी बससेवा सुरू केली जाईल अशी घोषणा केली होती. मात्र त्याचा फायदा परप्रांतीयांना होत आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना नाही, त्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

बुलढाणा येथील अमोल खर्चे म्हणाला, ‘कोटा'चे विद्यार्थी मोफत प्रवासाने महाराष्ट्रात आणले तसे, आम्हाला गावाकडे जाण्यासाठी व्यवस्था होईल असे वाटले होते. मात्र जो आदेश निघाला आहे यात सरकारने आमची फसवणूक केली आहे.’ तर, ‘विद्यार्थ्यांची मानसिकता पाहून सरकारने संवेदनशीलपणे निर्णय घ्यायला पाहिजे होता. मध्यरात्रीतून आदेश बदलून फसवणूक केली आहे. सरकारने हा निर्णय रद्द करून, विद्यार्थ्यांच्या मोफत प्रवासाची सोय करावी, अशी मागणी एमपीएससी स्टुडंट्स राईट्सचे अध्यक्ष, महेश बडे यांनी केली आहे. 

राज्य सरकारने तातडीने हे तर्कविसंगत आदेश सुधारावेत. राज्यातंर्गत जिल्ह्यात प्रवासासाठी शुल्क आणि परराज्यात जाण्यासाठी मात्र मोफत प्रवास आहे. पुणे प्रतिबंधित क्षेत्रातून इतर जिल्ह्यात जाण्यास बंदी ,पण राज्याबाहेर जाण्यास परवानगी दिली आहे. हे चुकीचे आहे. 
मुकुंद किर्दत, शहराध्यक्ष, आप. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students are outraged that students have to pay double for tickets

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: