जानेवारीमध्ये कॉलेज सुरु होणार पण, हॉस्टेलचे काय? विद्यार्थी पेचात

students are tensed due to hostel after college start in January
students are tensed due to hostel after college start in January

पुणे : कोरोनामुळे बंद पडलेली महाविद्यालय, विद्यापीठाचे शैक्षणिक विभाग जानेवारी महिन्यापासून पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. विद्यार्थीही देखील थेट शिक्षण घेण्यासाठी इच्छुक आहेत. पण पुण्याबाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठ, महाविद्यालयाचे वसतिगृह सहज उपलब्ध होणार नसल्याने निवासाचा मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

सावित्रीबाई पुणे विद्यापीठात राज्याच्या ग्रामीण भागातून विद्यार्थी मोठ्याप्रमाणात शिक्षणासाठी येतात. विद्यापीठाचे वसतिगृह सवलतीच्या शुल्कात उपलब्ध होत असल्याने विद्यार्थ्यांचा मोठा खर्च वाचतो.  पुण्यातील अनेक महाविद्यालयांचे वसतिगृह देखील महाविद्यालयांच्या आवारात आहेत. त्यामुळे पालक विद्यार्थ्यांना तेथेच रहाण्याची सोय करतात. 

मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला आणि तेव्हापासून पुणे विद्यापीठासह सर्व महाविद्यालयांचे वसतिगृह बंद आहेत. जानेवारी महिन्यात कमी विद्यार्थी संख्येमध्ये महाविद्यालये सुरू होण्याची शक्यता आहे. महाविद्यालये, प्राध्यापक, विद्यार्थी यांनी याचे स्वागत केले आहे. 

पुणे विद्यापीठात साडे तीन हजार विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी वसतिगृहात रहातात. शैक्षणिक विभाग सुरू करताना एका खोली मध्ये एकच विद्यार्थी असला पाहिजे, खोली शेअरींग करता येणार नाही, वसतीगृहात आल्यावर विद्यार्थ्याला १४ दिवस क्वारंटाइन करणे, त्याचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आहे का? तपासणे अशा अनेक अटी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) टाकल्या आहेत. पण विद्यापीठात मुलांच्या वसतीगृहांमध्ये ७२१ खोल्या आहेत तर मुलींच्या वसतिगृहात ५१५ खोल्या आहेत. म्हणजे साडेतीन हजार विद्यार्थ्यांपैकी केवळ १ हजार २३६विद्यार्थ्यांची सोय उपलब्ध होणार आहे. महाविद्यालयांच्या वसतीगृहांमध्ये खोल्यांची संख्या १०० च्या आत आहे, तेथे व्यवस्था करायची असा पेच महाविद्यालयांसमोर आहे. 


नियम बदलतील? 
अनलाॅकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर वाहनांमधून प्रवास करताना प्रवासी संख्येवर मर्यादा होती, कालांतराने ती १०० टक्के प्रवासी वाहतूक सुरू झाली. त्याच प्रमाणे 'यूजीसी'ने आत्ता एका खोलीत एकच विद्यार्थी राहिल असे सांगितले असले तरी, कोरोनाच्या संसर्गाचा आढावा घेऊन या नियमात बदल होऊम खोली शेअरींग सुविधा उपलब्ध होऊ शकते, असे अधिकार्यांनी सांगितले. 


२१०० जणांनी साहित्य नेले
पुणे विद्यापीठाने अंतिम वर्षाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे घेऊन जाण्यास २ डिसेंबरची मुदत दिली आहे. त्यानंतर ज्यांचे साहित्य राहिले असेल ते एका खोलीत एकत्र ठेऊन खोल्या रिकाम्या केल्या जाणार आहेत. आत्तापर्यंत अंतिम व प्रथम वर्षाच्या मिळून ८१२ मुलींनी व १ हजा३६५ मुलांनी असे एकुण २ हजार १७७ जणांनी साहित्य नेले आहे. 


"पुणे विद्यापीठातील अंतिम वर्षाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना ८ दिवसात वसतिगृह रिकामे करण्याची सूचना दिली आहे. पुढच्या वर्षीचे वर्ग कधी सुरू होणार याची लेखी सूचना अद्याप निघालेली नसली तरी वसतिगृहांची देखभाल व सॅनिटायझेशन करून ते विद्यार्थ्यांसाठी तयार करून ठेवले जातील. शासनाच्या धोरणाप्रमाणे विद्यार्थ्यांना वसतिगृह उपलब्ध करून दिले जातील."
- डाॅ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव, पुणे विद्यापीठ


"महाविद्यालयाच्या वसतिगृहातील कोविड सेंटर आता बंद झाले आहे. ते सॅनिटायईस करून व्यवस्थित केले जात आहे. महाविद्यालये सुरू करताना प्रथम पुण्यातील विद्यार्थ्यांना बोलवले जाईल. पुण्याबाहेरील विद्यार्थ्यांना स्थिती सुधारल्यानंतर सूचना दिल्या जातील. तो पर्यंत त्यांचे आॅनलाइन शिक्षण सुरू असेल. तसेच त्यांचे प्रॅक्टिकल देखील नंतर घेतले जातील. 
- प्राचार्य डॉ. पी. बी. बुचडे, गरवारे महाविद्यालय


"पुणे विद्यापीठात एमए हिंदीला प्रवेश घेतला आहे. जानेवारीत विभाग करू करताना वसतिगृह देखील उपलब्ध करून द्यावे. अनेक विद्यार्थी हे सामान्य घरातील आहेत, त्यांना बाहेर राहावे लागणे परवडणारे नाही. याचा विचार शासनाने करावा."
- दयानंद शिंदे, विद्यार्थी


पुणे विद्यापीठातील वसतिगृहाची क्षमता

वसतिगृह संख्या क्षमता खोली संख्या 
मुलांचे  २०१९ ७२१
मुलींचे १४६५   ५१५
एकुण १८ ३४८४ १२३६

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com