Plastic Pollution : पुण्यातील विद्यार्थी बनला ‘प्लॅस्टिक योद्धा’, पर्यावरण संरक्षणासाठी कल्पक निर्मितीतून दुहेरी लढा
Student Innovator : प्लॅस्टिक प्रदूषणावर उपाय शोधताना पुण्यातील बारावीच्या विद्यार्थ्याने बायोफिल्टर तयार केला असून, त्याला IIT दिल्लीच्या 'Changemakers' कार्यक्रमात राष्ट्रीय मान्यता मिळाली आहे.
पुणे : प्लॅस्टिकचे प्रदूषण रोखण्याचा ध्यास घेतलेल्या पुण्यातील विद्यार्थ्याने बायोफिल्टर तयार केला आहे. त्याच्या प्रयत्नांना राष्ट्रीय पातळीवर दाद मिळत आहे. प्रसन्न पवार असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.